Saturday, May 3, 2025
Homeदेश विदेशGST News : जीएसटी संकलन २.३७ लाख कोटी; एप्रिलमध्ये आठ वर्षांनंतर प्रथमच...

GST News : जीएसटी संकलन २.३७ लाख कोटी; एप्रिलमध्ये आठ वर्षांनंतर प्रथमच विक्रमी पातळी

नवी दिल्ली | New Delhi

नुकत्याच संपलेल्या एप्रिल महिन्यात देशातील जीएसटी संकलन (GST Collection) प्रथमच विक्रमी २.३७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्यावर्षीच्या याच महिन्यातील २.१० लाख कोटी रुपयांपेक्षा ते १२.६ टक्क्यांनी जास्त आहे. २०१७ मध्ये जीएसटी करप्रणाली लागू झाल्यानंतर एप्रिल २०२५ मधील संकलन सर्वाधिक ठरले आहे. जीएसटी संकलनातील ही वाढ सरकारी कायदे आणि प्रणालींच्या पालनाने शक्य झाल्याचा दावा सरकारी अधिकाऱ्यांनी केला आहे.

- Advertisement -

केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget) सरकारने आर्थिक वर्षासाठी जीएसटी महसुलात ११ टक्के वाढ अपेक्षित धरली होती. जीएसटी संकलनातून ११.७८ लाख कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवले होते. या अंदाजात केंद्रीय जीएसटी आणि भरपाई उपकरातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे. केंद्र सरकारने नुकत्याच संपलेल्या एप्रिल महिन्यातील जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर केली आहे. एप्रिल २०२४ मध्ये जीएसटी संकलन २.१० लाख कोटी रुपये होते.

१ जुलै २०१७ ला नवी करप्रणाली (Tax) लागू झाल्यानंतरचे हे दूसरे सर्वाधिक जीएसटी संकलन होते. या वर्षी एप्रिल महिन्यात देशांतर्गत व्यवहारांतून जीएसटी संकलन १०.०७ टक्क्‌यांनी वाढून ते १.९ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आयात वस्तूंवरील कर २०.८ टक्क्यांनी वाढून तो ४६,९१३ कोटी रुपये झाला आहे. एप्रिलमध्ये जारी केलेल्या परताव्याच्या रकमेत ४८.३ टक्क्यांनी वाढ होऊन ती २७, ३४१ कोटी रुपये झाली आहे. चालू वर्षी मार्चमध्ये जीएसटी संकलन गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ९.९ टक्क्यांनी वाढून १.९६ लाख कोटी रूपये झाले.

दरम्यान, यावर्षी फेब्रुवारीत नोंदवलेल्या १.८४ लाख कोटी रुपयांच्या कर संकलनापेक्षा टप्प्याटप्प्याने जीएसटी संकलन ६.८ टक्क्यांनी जास्त होते. मार्चमध्ये एकूण जीएसटी महसुलात सीजीएसटी (केंद्रीय जीएसटी) तून ३८,१०० कोटी, राज्य जीएसटीतून ४९,९०० कोटी, एकात्मिक जीएसटीतून ९५,९०० कोटी रुपये तर भरपाई उपकरातून १२,३०० कोटी रुपये समाविष्ट होते.

पाच राज्यांतून सर्वाधिक कर

फेब्रुवारीत सीजीएसटी संकलन ३५,२०४ कोटी, राज्य जीएसटी ४३,७०४ कोटी, एकात्मिक जीएसटी ९०,८७० कोटी आणि भरपाई उपकर १३,८६८ कोटी रुपये होते. मार्चमध्ये जीएसटी संकलनात महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा पहिल्या पाच राज्यांत समावेश होता. महाराष्ट्राने मार्चमध्ये ३४,५३४ कोटी रुपये दिले. गेल्या वर्षीच्या मार्चपेक्षा ते १४ टक्क्यांनी जास्त आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

माघार घेता घेता…काका झाले आमदार

0
श्रीराम जोशी| 9822511133 पंधरा वर्षांपूर्वीचा तो दिवस मला आजही आठवतो....2009मधील विधान परिषदेच्या नगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील उमेदवारी माघारीचा तो शेवटचा दिवस होता... काँग्रेसकडून...