नवी दिल्ली | New Delhi
इस्रोने आज (रविवारी) सकाळी ५.५९ वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्राच्या पहिल्या लाँच पॅड (FLP) वरून PSLV-C61 रॉकेटचे प्रक्षेपण केले होते. मात्र, तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक अडचण आल्याने ते अपयशी ठरले आहे. याबाबतची माहिती ISRO प्रमुख व्ही. नारायणन यांनी दिली आहे. पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी इस्रोने हा उपग्रह पाठविला होता. हा उपग्रह घेऊन जाणारे रॉकेट दुसऱ्या टप्प्यापर्यंत सामान्यपणे कार्यरत होते. परंतू, तिसऱ्या टप्प्यात जाताना तांत्रिक अडचण उद्भवली. यामुळे हे रॉकेट उपग्रह निर्धारित कक्षेत पोहोचवू शकले नाही. यामुळे इस्रोचे हे १०१ वे मिशन अर्धवटच राहिले आहे.
हा उपग्रह EOS-04 सारखाच होता आणि त्याचे काम पृथ्वीचे फोटो आणि माहिती पाठवणे होते, जेणेकरून महत्त्वाच्या कामांसाठी डेटा मिळवता येईल. मुख्य बाब म्हणजे, या रॉकेटच्या मदतीने सीमेवर होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाणार होते. या रॉकेटने EOS-09 ला सन सिंक्रोनस पोलर ऑर्बिट (Sun Synchronous Polar Orbit – SSPO) मध्ये नेले. ‘सी-बँड सिंथेटिक अपर्चर रडार’ ने सुसज्ज, EOS-09 कोणत्याही हवामान परिस्थितीत कधीही पृथ्वीच्या पृष्ठभागाचे उच्च-रिझोल्यूशन प्रतिमा घेण्यास सक्षम असेल.
#WATCH | Indian Space Research Organisation (ISRO) launches PSLV-C61, which carries the EOS-09 (Earth Observation Satellite-09) into a SSPO orbit, from Sriharikota, Andhra Pradesh.
EOS-09 is a repeat satellite of EOS-04, designed with the mission objective to ensure remote… pic.twitter.com/4HVMZzXhP0
— ANI (@ANI) May 18, 2025
दरम्यान, व्ही. नारायणन (V. Narayanan) म्हणाले की, तिसऱ्या टप्प्यात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे हे मिशन पूर्ण होऊ शकले नाही. आम्ही डेटा गोळा करत आहोत. त्याचे विश्लेषण करून पुन्हा या मोहिमेवर येऊ, असे त्यांनी सांगितले. तर भारतीय शास्त्रज्ञ डॉ. डब्ल्यू. सेल्वमूर्ती यांनी “हा उपग्रह खूप खास आहे कारण तो अशा अनेक उपग्रहांचा भाग आहे, जे पृथ्वीवर लक्ष ठेवतात आणि कोणते बदल होत आहेत हे शोधतात. हा उपग्रह शेती, वन, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा यासारख्या कामांमध्ये मदत करेल. देशाच्या सीमांवर लक्ष ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले.