Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVaishno Devi landslide : वैष्णो देवी भूस्खलनातील मृतांची संख्या ३४ वर; अद्यापही...

Vaishno Devi landslide : वैष्णो देवी भूस्खलनातील मृतांची संख्या ३४ वर; अद्यापही बचावकार्य सुरू

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) कटरा (Katra) येथील वैष्णोदेवी (Vaishno Devi) धाम येथे अर्धकुमारीजवळ काल (मंगळवारी) भूस्खलन झाल्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत कालपर्यंत सात जणांचा मृत्यू झाला होता. मात्र आज ही संख्या अधिक वाढली असून, मृतांची संख्या ३४ वर पोहोचली आहे.अद्यापही याठिकाणी बचाव कार्य सुरु असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

मंगळवारी जम्मू शहरात २४ तासांपेक्षा कमी कालावधीत २५० मिमी पेक्षा जास्त पाऊस (Rain) पडला. यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. घरे आणि शेतात पाणी शिरले. तसेच भूस्खलनामुळे अनेक पूल आणि रस्ते देखील खराब झाले. त्यानंतर ३५०० हून अधिक लोकांना प्रशासनाला वाचवण्यात यश येऊन, त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

YouTube video player

दरम्यान, सध्या जिल्हा प्रशासन, पोलिस, एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर बचाव कार्य करत आहेत. तर
उत्तर रेल्वेने जम्मू-कटरा येथून धावणाऱ्या आणि आज येथे थांबणाऱ्या २२ गाड्या रद्द केल्या आहेत. याशिवाय, २७ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तथापि, कटरा-श्रीनगर दरम्यानची रेल्वे सेवा सुरूच आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...