नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsson Session of Parleament) आज (दि.२१) पासून सुरूवात होत आहे. या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच ऑपरेशन सिंदूर आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला (Operation Sindoor and Astronaut Shubanshu Shukla) यांनी फडकावलेल्या तिरंग्याबद्दल भावना देखील व्यक्त केल्या.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “पाऊस (Rain) नाविन्य आणि नवसृजनाचे प्रतिक आहे. हा काळ देशाला नवी उर्जा, प्रेरणा आणि नव्या धोरणांना जन्म देणारा आहे. आतापर्यंत देशभरात चांगला पाऊस झाला आहे. शेतीसाठी चांगला पाऊस पडत आहे. वातावरण चांगलं असल्याच्या बातम्या आहेत. पाऊस हा शेतकऱ्यांची (Farmer) अर्थव्यवस्था, देशाची अर्थव्यवस्था, ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था आणि प्रत्येक कुटुंबाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. गेल्या दहा वर्षांतील तिप्पट जास्त पाणीसाठा या पावसाळ्यात निर्माण झाला आहे. त्याचा येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेला जास्त फायदा होणार आहे”, असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, “भारताचा पहिला तिरंगा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर फडकला हा क्षण ऐतिहासिक होता. प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रवासातील भारताचे (India) यश दर्शवते”, असे मोदी यांनी सांगितले. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ चा उल्लेख करत मोदी म्हणाले, भारतीय सैन्याने दहशतवाद्यांच्या घरात घुसून २२ मिनटांमध्ये त्यांची घरे जमीनदोस्त केली. त्यात आपण १०० टक्के ध्येय प्राप्त केले. सैन्याने जगाला दाखवून दिलं की, मेड इन इंडियाची ताकद काय आहे”, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
तसेच “पूर्वी भारत जगात दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था (Economy) होता. आता मात्र, भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे.जगातील प्रत्येक मंचावर भारत विकासाची दस्तक देत आहे. देशात माओवाद आणि नक्षलवादही आता सीमित झाला आहे. बंदुकीच्या समोर आपला देश जिंकत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे,” असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.




