Monday, May 19, 2025
Homeब्रेकिंग न्यूजRahul Gandhi : "पाकिस्तानला माहिती देणे ही चूक नव्हती, तर हा...

Rahul Gandhi : “पाकिस्तानला माहिती देणे ही चूक नव्हती, तर हा गंभीर…”; राहुल गांधींनी ‘तो’ Video शेअर करत परराष्ट्रमंत्री जयशंकर यांना घेरलं

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) दहशतवाद्यांनी (Teerorist) केलेल्या हल्ल्यात २६ भारतीयांचा मृत्यू (Death) झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. या कारवाईमुळे देशभरातील नागरिकांमध्ये समाधान पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे या ऑपरेशनवरुन राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे.

भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ.एस.जयशंकर (S Jaishankar) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी पाकिस्तानला हल्ल्याची माहिती असल्याचे म्हटल्याचे ऐकू येते.आता यावरुन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचाच व्हिडिओ शेअर करून त्यांना घेरत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे,  ज्यामध्ये परराष्ट्र मंत्री म्हणत आहेत की, “कारवाईच्या सुरुवातीलाच पाकिस्तानला माहिती देण्यात आली होती की, भारत फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य करत आहे, पाकिस्तानी सैन्याला नाही.

दरम्यान, या व्हिडिओवरुन राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की,”परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचे मौन निषेधार्ह आहे. मी पुन्हा विचारेन की, पाकिस्तानला हल्ल्याची माहिती असल्याने आपण किती भारतीय विमाने गमावली? ही चूक नव्हती, हा गुन्हा होता. देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. परराष्ट्रमंत्र्यांनी सार्वजनिकरित्या हे मान्य केले आहे. हल्ल्यापूर्वी पाकिस्तानला माहिती देणे गुन्हा आहे”, अशी टीका त्यांनी व्हिडीओच्या (Video) माध्यमातून केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने केले निवेदन जारी

दरम्यान, याआधी राहुल गांधींनी एक्सवर (ट्विटर) परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडीओच्या माध्यमातून राहुल गांधींनी एस. जयशंकर यांनी दिलेल्या विधानावर प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी एक निवेदन जारी करून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या विधानाबाबत केलेल्या दाव्यांचे खंडन केले. “राहुल गांधी यांनी दावा केला होता की, परराष्ट्रमंत्र्यांनी कबूल केले आहे की भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल पाकिस्तानला आधीच माहिती दिली होती. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने ‘तथ्ये विकृत पद्धतीने सादर केली गेली आहेत’, असे म्हणत दाव्यांचा निषेध केला. तसेच आम्ही सुरुवातीलाच पाकिस्तानला इशारा दिला होता, जो स्पष्टपणे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यातील बाब आहे”, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या