Wednesday, February 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या निर्दोष सुटकेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

मोठी बातमी! मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या निर्दोष सुटकेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती

नवी दिल्ली | New Delhi

२००६ साली मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या लोकल रेल्वे गाडीत साखळी बॉम्बस्फोट (Mumbai Local Bomb Blast Case) घडविण्यात आला होता. या बॉम्बस्फोटात २०९ प्रवासी ठार झाले होते. त्यानंतर या बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना अटक केली होती. यासर्व आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) सोमवार (दि.२१) रोजी निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

- Advertisement -

त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) या याचिकेवर तातडीने सुनावणी घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना (Accused) सर्वोच्च न्यायालयाने नोटीसा बजावली आहे. यात म्हटले की, जे आरोपी या प्रकरणात पूर्वीच निर्दोष ठरवले गेले आहेत आणि आता जामिनावर किंवा मुक्त झाले आहेत, त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवले जाणार नाही. सध्या या प्रकरणातील पुढील सुनावणीची प्रतीक्षा असून सर्वोच्च न्यायालयाने संबंधित सर्व पक्षकारांना नोटीस बजावून आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.

YouTube video player

मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल काय?

मुंबई उच्च न्यायालयाने २१ जुलै रोजी २००६ साली मुंबईत घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा निकाल दिला होता. यावेळी न्यायालयाने बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींची निर्दोष सुटका केली होती. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती एस चांडक यांच्या खंडपीठाने हा निर्णय देताना आरोपींना शिक्षा द्यावी असे पुरावे समोर आले नाहीत असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले होते.तसेच साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत, स्फोटाच्या १०० दिवसांनंतर साक्षीदारांना आरोपी आठवणे अशक्य आहे, स्फोटांसाठी वापरलेले बाँब ओळखण्यात तपास संस्थेला अपयश आले, बॉम्बच माहित नाही तर मिळालेल्या बाँब, बंदुका,नकाशा या पुराव्यांना अर्थ नाही, अशी निरीक्षणे न्यायालयाने नोंदवली होती.

नेमकं काय घडलं होतं?

११ जुलै २००६ याच दिवशी मुंबईची जीवनवाहिनी बॉम्बस्फोटांनी हादरली होती. पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या सात स्थानकांवर बॉम्बस्फोट घड़विण्यात आले होते. प्रेशर कुकरमध्ये बॉम्ब बनवून ते घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबई लोकलमध्ये ठेवण्यात आले होते. या साखळी स्फोटांमध्ये २०९ निष्पाप मुंबईकरांचा बळी गेला होता. तर ७१४ जण जखमी झाले होते. या प्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली होती. एका आरोपीचा तुरुंगातच मृत्यू झाला होता. उर्वरितांना कनिष्ठ न्यायालयाने शिक्षाही दिली होती. यानंतर यापैकी ११ आरोपी उच्च न्यायालयात गेले होते. तिथे त्यांना दोन दिवसांपूर्वीच निर्दोष सोडण्यात आले होते.

ताज्या बातम्या

Soybean Rate : राहाता बाजार समितीत सोयाबीनची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) बुधवारी सोयाबीनला (Soybeans) 5500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला. सोयाबीनच्या 37 क्विंटलची आवक झाली. सोयाबीनला...