Thursday, June 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSukhoi Su-30MKI : आसाममध्ये सुखोई ३० विमान कोसळले; महाराष्ट्रातील पायलटसह दोघांचा...

Sukhoi Su-30MKI : आसाममध्ये सुखोई ३० विमान कोसळले; महाराष्ट्रातील पायलटसह दोघांचा मृत्यू

मुंबई | Mumbai

आसाममधील (Assam) कार्बी आंगलोंग भागात प्रशिक्षणा दरम्यान रडारवरून गायब झालेले भारतीय हवाई दलाचे सुखोई ३० एमकेआय (IAF Sukhoi Su-30MKI) लढाऊ विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत दोन पायलटचा मृत्यू झाला असून, यात महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्याचे सुपुत्र पूर्वेश दुरागकर यांचा समावेश आहे. आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दुसऱ्या एक्स-पोस्टने दोन्ही वैमानिकांच्या मृत्यूची माहिती दिली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमान सरावावेळी (Sukhoi 30 Aircraft Crashed) उड्डाण घेतल्यानंतर ६० किमी अंतरावर विमान कोसळले. या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरागकर यांचे निधन झाले आहे. गुरुवारी संध्याकाळी जोरहाट एअरबेसवरून सुखोई ३० एमकेआय या लढाऊ विमानाने उड्डाण घेतले होते. पण काही वेळातच विमान रडारवरून बेपत्ता झाले. त्यानंतर आसममधील डोंगर आणि घनदाट जंगलात कोसळले, असे या विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, सुखोई एसयू-३० एमकेआय हे भारतीय हवाई दलाच्या (Indian Air Force) सर्वात प्रगत आणि शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. हे एक दोन इंजिन असलेले बहुउद्देशीय लढाऊ विमान असून, जे हवाई संरक्षण, लांब पल्ल्याच्या हल्ल्यासाठी आणि देखरेखीसाठी वापरण्यात येते. गेल्या १२ वर्षात आठव्यांदा सुखोई फायटर जेट विमान कोसळण्याची घटना घडली आहे.

ताज्या बातम्या

Ganesh Gite : विधानपरिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेताना गणेश गितेंचा...

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते गणेश गिते (Ganesh Gite) यांनी उमेदवारी मागे घेताना पक्षातील काही लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप करत नाशिकच्या...