Sunday, September 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! राहुल गांधींसह काँग्रेस खासदारांचे PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन; पोलिसांकडून...

मोठी बातमी! राहुल गांधींसह काँग्रेस खासदारांचे PM मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन; पोलिसांकडून धरपकड

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन सुरु आहे. काल (बुधवारी) संसदेवर काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा मोर्चा पोलिसांनी अडवला. यावेळी दिल्ली पोलसांनी लाठीचार्ज केल्यामुळे अनेक युवक-युवती जखमी झाले. या आंदोलनाचे तीव्र पडसाद संसदेत उमटल्याने काल आणि आज कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

दरम्यान, विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या विरोधात विरोधी पक्षाचे नेते देखील आक्रमक झाले असून, त्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली आहे. तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष दीपके यांची जंतरमंतरवर भेट घेण्यासाठी जात असताना खासदार राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इतर खासदारांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी सत्ताधाऱ्यांविरोधात आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दिल्ली पोलिसांकडून नेत्यांची धरपकड

पंतप्रधान निवासाबाहेर काँग्रेस (Congress) नेत्यांनी ठिय्या मांडताच दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सक्रिय झाल्या. पोलिसांनी कारवाई करत अनेक काँग्रेस नेत्यांना आणि खासदारांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांच्या या कारवाईवर विरोधी नेत्यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले असून, “दिल्लीत पोलिसांची उघड गुंडागर्दी सुरू आहे,” असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

शरद पवारांनी घेतली अभिजित दीपके यांची भेट

दुसरीकडे, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी थेट जंतर-मंतर गाठून अभिजीत दीपके आणि आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी दीपके यांनी पोलिसांकडून झालेल्या लाठीहल्ल्याची आणि अन्यायाची माहिती पवारांना दिली. शरद पवारांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा करत त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. दरम्यान संसदेतील गदारोळ, विरोधी नेत्यांची धरपकड आणि जंतरमंतरवरील वाढता दबाव पाहता केंद्र सरकार आता काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Vishakha Raut : ठाकरे गटाच्या माजी महापौर विशाखा राऊत यांना झटका;...

0
मुंबई | Mumbai शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत (Vishakha Raut) यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. पालघर...