Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजShah vs Gandhi : पंतप्रधान संघाचा स्वयंसेवक, सरकारी संस्थांचे काय घेऊन बसलाय;...

Shah vs Gandhi : पंतप्रधान संघाचा स्वयंसेवक, सरकारी संस्थांचे काय घेऊन बसलाय; शहांनी राहुल गांधींना सुनावले

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

मंगळवारी भाषण करताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gnadhi) यांनी म्हटले होते की, देशभरातील सरकारी संस्थांवर संघाचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी त्यांना सांगतो देशाचा पंतप्रधान संघाचा स्वयंसेवक आहे. देशाचा गृहमंत्री संघाचा आहे. जनतेने आम्हाला जनादेश दिला म्हणून आम्ही पदांवर आहोत. त्यामुळे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) संघाचे स्वयंसेवक आहेत. तुम्ही सरकारी संस्थांचे काय घेऊन बसलाय असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (काल) लोकसभेत केला.

- Advertisement -

दोन दिवसांपासून लोकसभेत निवडणूक प्रक्रिया सुधारणा अंतर्गत एसआरआयवर चर्चा सुरू होती. मंगळवारी राहुल गांधींनी मोदी सरकारसह निवडणूक आयोगावर निशाणा साधत संघावर प्रहार केला होता. त्यानंतर बुधवारी या चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याची चिरफाड करत, सरकारी संस्थांवर संघाच्या प्रतिनिधींचे समर्थन करत, देशातील जनतेने संघ विचाराला जनादेश दिलेला असल्याने या पदांवर संघाचे स्वयंसेवक असले तर काय बिघडले, असा प्रतिप्रश्न केल्याने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बुधवारी वातावरण तापले.

YouTube video player

लोकसभेत निवडणूक (Loksabha Election) सुधारणांवरील चर्चेला उत्तर देताना शहा म्हणाले की, भाजप सदस्य निवडणूक सुधारणांवरील चर्चेला मागेपुढे पाहत नाही. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या जागेवरून उभे राहिले आणि त्यांनी शहा यांना आव्हान देत सांगितले, मी तुम्हाला मतचोरीच्या आरोप करणाऱ्या माझ्या तीन पत्रकार परिषदांवर चर्चा करण्याचे आव्हान देतो. त्यावर शहा यांनी उत्तर दिले, मी कसे उत्तर द्यायचे ते मी ठरवेन. मी सर्व उत्तरे देईन. मी माझ्या भाषणाचा क्रम ठरवेन, विरोधी पक्षनेत्यांनी मला सांगू नये, असे म्हटले.

नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी…! लोकसभेत दिली मतचोरीची उदाहरणे

मतचोरीच्या मुद्यावरून विरोधी पक्षांवर थेट निशाणा साधला. गेल्या अनेक महिन्यांपासून विरोधक मतचोरीचा मुद्दा उपस्थित करत आहेत. दरम्यान, आज शहा यांनी पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांचे नाव घेत मतचोरीसंदर्भात भाष्य केले. शहा म्हणाले, मतचोरीचे तीन प्रकार असतात, पहिला प्रकार म्हणजे पात्रता नसतानाही मतदार बनणे, दूसरे म्हणजे, अनैतिक मार्गाने निवडणूक जिंकणे आणि तिसरे म्हणजे मतांच्या विरोधात पद मिळवणे. हे तीनही प्रकार मतचोरीच्या कक्षेत येतात.

देशात पहिली मतचोरी नेहरूंनी केली

शहा म्हणाले, जेव्हा देशाचे पहिले पंतप्रधान निवडण्याची वेळ आली, तेव्हा पहिली मतचोरी झाली. तेव्हा देशात जेवढे प्रांत होते तेवढेच काँग्रेसचे प्रांताध्यक्ष होते. त्यांच्या मतांवरून देशाचा पहिला पंतप्रधान ठरणार होता. त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांना २८ मते मिळाली, तर जवाहरलाल नेहरू यांना केवळ दोन मते मिळाली. मात्र, तरीही पंतप्रधान जवाहरलाल नेहरू बनले. यानंतर काँग्रेस खासदारांनी सभागृहात गदारोळ करायला सुरुवात केली.

इंदिरा गांधींनी केली दुसरी मतचोरी

दुसऱ्या प्रकारची मतचोरी म्हणजे अनैतिक मार्गाने निवडणूक जिंकणे. इंदिरा गांधी रायबरेलीतून निवडून आल्यानंतर श्री. राजनारायण यांनी निवडणुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे म्हणत, अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने इंदिरा गांधी यांनी योग्य पद्धतीने निवडणूक जिंकली नाही, असे म्हणत ती निवडणूकच रद्द केली. हीदेखील खूप मोठी मतचोरी होती, असे शहा म्हणाले.

सोनियांची तिसरी मतचोरी

मतचोरीचा तिसरा प्रकार म्हणजे पात्र नसतानाही मतदार होणे. या संदर्भात बोलताना शहा यांनी एका न्यायालयीन वादाचा उल्लेख केला. ते म्हणाले, सोनिया गांधी या भारताच्या नागरिक बनण्यापूर्वीच मतदार बनल्या होत्या. असे प्रकरण दिल्लीच्या एका दिवाणी न्यायालयात दाखल झाले आहे. यासंदर्भात आता त्यांना न्यायालयात उत्तर द्यावे लागणार आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ७ जानेवारी २०२६ – जगाच्या ठेकेदाराची दादागिरी

0
अमेरिका स्वतःला जगाचा एकमेव तारणहार-पालनहार समजते आणि या गृहीतकाला सगळ्या जगाने मान तुकवून मान्यता द्यावी असा अट्टहास नेहमी सुरु असतो. त्यासाठीच मनमानी करून वाट्टेल...