नवी दिल्ली | New Delhi
राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांनी काल (शनिवार) सोशल मीडियावर (Social Media) एका मुलीसोबत पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये त्यांनी आपल्या रिलेशनशिपबाबत भाष्य केले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते. विशेष म्हणजे बिहार निवडणूक तोंडावर असताना अशा परिस्थितीत तेजप्रताप यादव यांची पोस्ट ही बिहारच्या राजकारणात वादळ निर्माण करु शकली असती. त्यामुळे राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी पुत्र तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. लालू प्रसाद यादव यांनी आपले ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांना आपल्या पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले आहे.
याबाबतची माहिती खुद्द लालू प्रसाद यांनी ट्विट करत दिली आहे. लालूंनी ट्विटमध्ये म्हटले की, “खाजगी जीवनातील नैतिक मूल्यांचे उल्लंघन करणे हे सामाजिक न्यायासाठीच्या (Justice) आपल्या सामूहिक संघर्षाला कमजोर करते. ज्येष्ठ मुलाचे वर्तन, लोकांमध्ये वागण्याची पद्धत आणि बेजबाबदार व्यवहार हे आपल्या कौटुंबिक (Family) मूल्यांच्या आणि संस्कारांच्या विरोधात आहे. त्यामुळे त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर करत आहे. यापुढे त्याची कोणतीही भूमिका पक्ष आणि कुटुंबाची भूमिका नसेल. त्याला पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले जात आहे”, अशी घोषणा लालू प्रसाद यादव यांनी केली.
निजी जीवन में नैतिक मूल्यों की अवहेलना करना हमारे सामाजिक न्याय के लिए सामूहिक संघर्ष को कमज़ोर करता है। ज्येष्ठ पुत्र की गतिविधि, लोक आचरण तथा गैर जिम्मेदाराना व्यवहार हमारे पारिवारिक मूल्यों और संस्कारों के अनुरूप नहीं है। अतएव उपरोक्त परिस्थितियों के चलते उसे पार्टी और परिवार…
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) May 25, 2025
तसेच लालू प्रसाद यादव यांनी पुढे म्हटले की, “त्याच्या खाजगी आयुष्यातील (Private Life) चांगले-वाईट तो स्वतःच पाहू शकतो. त्याच्याशी संबंध (Relation) ठेवणाऱ्यांनी आपल्या बुद्धीने निर्णय घ्यावा. मी नेहमीच लोकांमध्ये मान-सन्मान जपण्याचा प्रयत्न केला आहे. कुटुंबातील आज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात याच विचारांचे पालन केले आहे”, असेही ते म्हणाले आहेत.
तेजप्रताप यादव यांनी पोस्टमध्ये काय म्हटले होते?
तेजप्रताप यादव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शनिवारी एक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल काही गोष्टी लिहिल्या होत्या. तसेच एका युवतीसोबतचा फोटो शेअर केला होता. “मी तेजप्रताप यादव आणि माझ्यासोबत या फोटोत जी दिसत आहे, तिचे नाव अनुष्का यादव आहे. आम्ही दोघेही मागील १२ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो आणि प्रेमही करतो. आम्ही दोघेही मागील १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत. मला हे खूप दिवसांपासून तुम्हाला सांगायचे होते, पण कसे सांगू हे समजत नव्हते. त्यामुळे आज या पोस्टच्या माध्यमातून माझ्या मनातली गोष्ट तुमच्यासमोर मांडत आहे. आशा करतो की तुम्ही माझ्या भावना समजून घ्याल”, असे तेजप्रताप यादव पोस्टमध्ये म्हणाले होते.