Thursday, May 30, 2024
Homeनाशिकनाशिकमध्ये नैसर्गिक शेती चळवळीला वेग

नाशिकमध्ये नैसर्गिक शेती चळवळीला वेग

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सध्याचा शेतकरी हा आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने शेती करू लागला आहे. मात्र कृषी क्षेत्राबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच पुढील पिढी वाचवायची असेल तर नैसर्गिक शेती करणे हाच उत्तम पर्याय आहे. नाशिक येथील शेतकर्‍यांनी नैसर्गिक शेतीचे अत्यंत सुंदर मॉडेल तयार केले असून प्रत्येक शेतकर्‍याने नैसर्गिक शेतीच्या चळवळीत सहभाग घ्यावा, असे आवाहन झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांनी केले.

- Advertisement -

नाशिकमध्ये डॉ. सुभाष पाळेकर यांच्या उपस्थितीत तीन दिवसीय शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.4) येथील मुंगसरा परिसरात सुभाष पाळेकर कृषी अनुसंधान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी पाळेकर बोलत होते. व्यासपीठावर अभिनेते शाम पाठक, अभिनेते राजेश कुमार, ‘देशदूत’च्या संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, हितेश पटेल, अर्जुन पटेल, ज्ञानेश्वर रेवगडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पाळेकर पुढे म्हणाले की, जितके जास्तीत जास्त झाड लावली जातील तितका जास्त फायदा पक्ष्यांना होईल. जितके जास्त पक्षी वाढतील तितकी जास्त जैवविविधता सुधारण्यास मदत होईल. एक मोठा वृक्ष त्याखालोखाल मध्यम आकाराचा वृक्ष, त्याखाली छोटे झाड लावल्यास ही तिन्ही प्रकारची झाडे आपल्याल्या फळांचे उत्पादन देतात. त्याखालोखाल वृक्षांचे झुडूपही आपल्या चांगले फळ देतात. त्याखालोखाल वेल या पंचस्तरीय लागवडीमुळे जैवविविधता मोठ्या प्रमाणात सुधारण्यास मदत होते आणि आपल्याला उत्पन्नदेखील चांगले मिळते. तसेच प्राणवायूदेखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतो. आपल्या जमिनीचा जास्तीत जास्त फायदा आपण करून घेणे गरजेचे आहे. याशिवाय बीज विरहित फळे ही शरीरासाठी अत्यंत घातक असतात. बीजरहित फळांचे सेवन करायला असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अशी आहे ‘झिरो बजेट’ संकल्पना

पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर हे ‘झिरो बजेट’ या संकल्पनेवर आधारित नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते आहेत. रासायनिक शेतीमुळे जमिनीच्या आरोग्यासह शेतकर्‍याचा जीव धोक्यात असल्याने पाळेकरांचा रासायनिक शेतीला कडाडून विरोध होता. त्यामुळे त्यांनी कमी खर्चाची ‘झिरो बजेट’ शेती करण्यास सुरुवात केली. शेण आणि वनस्पतीचा वापर करून कमी खर्चाची व रासायनिक खतांशिवायच्या शेतीला ते आध्यात्मिक (स्पिरिच्युअल) शेती म्हणतात. नैसर्गिक शेती यशस्वी करण्यासाठी त्यांनी नैसर्गिक साहित्य वापरून जीवामृत व बीजामृत या दोन द्रव्यांची निर्मिती केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या