अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नवीन मोबाईल (Mobile) घेण्यावरून दोन गटांत हाणामारी (Two Groups Beating) झाल्याची घटना नवनागापूर (Nav Nagapur) परिसरामध्ये घडली. लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत तीन जण जखमी (Injured) झाले आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
रोहन संजय गिते (वय 19 रा. नवनागापूर) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी (दि.22) सायंकाळी मित्र सागर दांगट, प्रमोद गिते यांच्यासह मोपेड दुचाकीवरून हॉटेल राज रेजन्सिसमोरून जात असताना नसीम पठाण, वसीम पठाण, फैजल खान, अक्षय वंजारी, प्रतिक पवार व एक अनोळखी इसम (सर्व रा. नवनागापूर) यांनी मोबाईलवरून शिवीगाळ केल्याच्या कारणातून लोखंडी रॉडने मारहाण (Beating) करून जखमी केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
दुसर्या गटाचे अक्षय फ्रान्सिस वंजारी (वय 23 रा. साईराजनगर, नवनागापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मित्र वसीम पठाण, नसीम पठाण, प्रतिक पवार, फैजल खान यांना मोबाईल नवीन घेऊन देण्याच्या कारणातून प्रमोद गिते, सागर दांगट, रोहन गिते, रवी लोंढे (सर्व रा. नवनागापूर) यांनी शिवीगाळ केली, तसेच लोखंडी रॉडने मारहाण (Beating) केली. मारहाण करणार्या चौघांवर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.