Saturday, June 29, 2024
Homeनंदुरबारअज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे मोटरसायकलस्वार गंभीर जखमी

नवापूर – Navapur – श.प्र :

- Advertisement -

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर हॉटेल मानस जवळ एका मोटर सायकलीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील दोघे युवक गंभीर जखमी झाला. दोघा युवकांना नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्यानुसार सौरव राजेंद्र चौधरी (23) व राजेश महाले (24,दोघे रा.मोहाडी,धुळे) हे गुजरात राज्यातील व्यारा येथे आपल्या आत्याकडे कामानिमित गेले होते.

व्याराहून दोघे आपल्या मोटारसायकल (क्र.एम.एच.41-यू.4554 ) ने धुळ्याकडे जात असताना सोमवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास नवापूर येथील राष्ट्रीय महामार्ग वरील हॉटेल मानसजवळ एका अज्ञात वाहनाने मोटर सायकलीला जोरदार धडक दिल्याने महामार्गावरच दोघ युवक आदळल्याने दोघाना गंभीर दुखापत झाली.

आजूबाजूच्या लोकानी घटनास्थळी जावून दोघा युवकांना नवापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या दोघांना डोक्याला, हाता पायाला, तोंडावर, पाठीवर दुखापत झाली आहे.

पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पंचनामा केला. अज्ञात वाहन चालकाविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अज्ञात वाहन चालकाचा शोध घेत आहे. दोघ जखमी युवकांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पुुढील तपास हे.कॉ. गुमानसिंग पाडवी करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या