Tuesday, May 21, 2024
Homeनंदुरबारबोरविहीर येथे प्रेम विवाह करणार्‍या युवकाचा खून

बोरविहीर येथे प्रेम विवाह करणार्‍या युवकाचा खून

नवापूर – Navapur – श.प्र :

बोरविहीर ता.नवापूर येथे मुलीने गावातील एक मुलाशी प्रेम विवाह केला याचा राग येवुन युवकाचा चाकु ने भोसकुन खुन केल्याची घटना घडली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान युवकाच्या आई वडीलांवर ही चाकु हल्ला करण्यात आला आहे.याप्रकरणी दोघांना अटक ेरण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,नवापूर तालुक्यातील बोरविहीर येथे संशयीत आरोपी सखाराम नरसी गावित रा बोरविहीर यांच्या मुलीने गावातील एक मुलाशी प्रेम विवाह केला यांचे वाईट वाटुन दि 12 मार्च रोजी रात्री 8 वाजता आरोपी सखाराम नरसी गावीत,समुवेल सखाराम गागावित , संदिप सखाराम गावित सर्व रा बोरविहीर ता.नवापूर यांनी संगनमताने अजय राजाराम गावित (22) यांच्या घरात जाऊन संदिप याने हातातील चाकुने अजय गावीत याला छातीत उचव्या बाजुस वार करुन खुन केला.यात त्याचा मृत्यू झाला.

त्याच चाकुने सखाराम गावित यांनी मयताची आई सावित्रीबाई गावित यांच्या पोटावर वार करुन दुखापत केली.

तीघांनी मयताचे वडील राजाराम गावित यांनही काठीने मारहाण केली.याप्रकरणी प्रकाश राजाराम गावित यांच्या फिर्यादीवरून सखाराम नरसी गावित , संदिप सखाराम गावित दोन्ही रा बोरविहीर ता.नवापूर यांच्या विरूध्द भादवि कलम 302,307,452,324,504,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर,पो हे का विलास पाटील,प्रविण मोरे,गुमानसिंग पाडवी,नरेंद्र नाईक,विकास पाटील,किशोर भिल,हेमंत सैदाणे,पंकज सुर्यवंशी,योगेश साळवे,विक्की वाघ करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या