Tuesday, April 29, 2025
Homeनंदुरबारनवापूर येथे देशीविदेशी मद्यासह ८९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर येथे देशीविदेशी मद्यासह ८९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर | श.प्र.- NAVAPUR

नाशिक येथील विशेष पोलीस महानिरक्षकांचे पथक व नवापूर पोलीस (police) ठाण्याने संयुक्त कारवाई करुन ५ लाख ६९ हजार १०५ रुपयांचा देशीविदेशी मद्यसाठा, २ लाख ७८ हजार ३९० रुपयांच्या रोकडसह ८९ लाख २ हजार ४९५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी १५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

एरंडोल तालुक्यातील सराईत चोरट्याला मोहाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्याबापरे पुन्हा अवकाळीचे संकट ; मे महिन्यात पडणार एप्रिलपेक्षा अधिक पाऊस

नाशिक (nashik) येथील विशेष महानिरीक्षकांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शैलेश भटू पाटील, उपनिरीक्षक रविंद्र ईश्वर शिलावट, बशीर गुलाब तडवी, पो.हवालदार शेख शकील अहमद, पो.ना. प्रमोद सोनु मंडलीक, पो.ना. मनोज अशोक दुसाने, चा.पो.शि. नारायण कचरु लोहरे, नवापूर पोलीस स्टेशनचे पोनि ज्ञानेश्वर वारे, पोउनि अशोक मोकळ, असई युवराजसिंग परदेशी, पोशि परमानंद काळे, पोशि रणजित महाले यांनी नवापूर येथील गणेशहिल परीसरात जावून रात्री २०.३० वाजेच्या सुमारास छापा टाकला असता तेथे सुमारे ५ लाख ६९ हजार १०५ रुपये किमतीचा विदेशी दारु, बिअर प्रोव्हीशन गुन्ह्याचा माल, २ लाख ७८ हजार ३९० रुपयांची रोकड, ७८ लाख रुपये किमतीचे १७ चारचाकी वाहने, २ लाख ५५ हजार रुपये किमतीच्या ९ मोटरसायकली असा एकुण ८९ लाख २ हजार ४९५ रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला.

बापरे पुन्हा अवकाळीचे संकट ; मे महिन्यात पडणार एप्रिलपेक्षा अधिक पाऊस

कौशिक सुरेशभाई पटेल, पंकजभाई ईश्वरभाई पटेल, शाम अचल माजी, अंगतसिंह दिनेशसिंह भदौरिया, प्रतीक सुमनभाई पटेल,, अखिलेश शिवदान सिंहभदौरिया, अनिलसिंह सुरेंद्रसिंह भदौरिया, सामंतसिंह शिवपालसिंह भदौरिया, सुरजकुमार हाकिम सिंह, जितेंद्रसिंह समशेरसिंह भदौरिया,

पुट्टसिंग भदौरिया, कृष्णकुमारसिंह शिवदानसिंह भदौरिया, शामसिंह रामप्रसादसिंह भदौरिया, शिवप्रताप तिलकसिंह भदौरिया, अजीत पवार लोखंडे व नवापूर येथील गणेश हिल परिसरातील रहिवासी असलेले दोन विधीसंघर्षीत बालक यांनी संगनमत करुन विनापरवाना बेकायदा गुन्ह्याचा माल (मद्य) बेकायदेशीररित्या गुजरात राज्यात विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्याकब्जात बाळगला.

त्याचा साठा करुन तो पिकअप व इन्व्होवा कारमध्ये भरतांना मिळून आले आहेत. त्यांना अटककरण्यात आली आहे. घटनास्थळी मिळून आलेल्या चारचाकी १७ वाहनापैकी १५ वाहनांचे सिट दारु वाहतुकीसाठी कारण्यातआलेले आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे करीत आहेत.

बापरे पुन्हा अवकाळीचे संकट ; मे महिन्यात पडणार एप्रिलपेक्षा अधिक पाऊस

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Onion Price : वांबोरीत कांद्याला मिळतोय हा भाव

0
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri सोमवार दि. 28 एप्रिल रोजी वांबोरी उपबाजारात (Vambori Onion Market) झालेल्या कांदा लिलावात 3 हजार 48 कांदा गोण्याची आवक झाली. एक...