Saturday, May 18, 2024
Homeनंदुरबार22 हजार ग्रामसेवकांचा संप

22 हजार ग्रामसेवकांचा संप

नवापूर – Navapur – श.प्र :

राज्यातील 22 हजार ग्रामसेवक संवर्ग 26 नोव्हेंबर 2020 रोजीच्या 1 दिवशीय लाक्षणिक संपात सहभागी होत असल्याबाबतचे निवेदन तहसिलदार मंदार कुलकर्णी, पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर, गटविकास अधिकारी सी.के.माळी यांना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखेतर्फे देण्यात आले आहे.

- Advertisement -

निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रलंबित न्याय मागण्यांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि.26 नोव्हेंबर 2020 रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करीत आहे.

जुनी पेन्शन योजना सर्वाना लागू करावी, ग्रामसेवक संवर्गाचे प्रलंबित प्रश्न, पंचायत विकास अधिकारी सन 2005 नंतरचे ग्रामसेवक यांना जुनी पेन्शन लागू करावी, प्रवास भत्ता वाढ, शैक्षणिक अर्हता बदल, अतिरिक्त कामे कमी करावी, जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामसेवक व इतर कर्मचारी मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभेची घातलेली अट रद्द करावी, खाजगीकरण/कंत्राटी कर्मचारी धोरण रद्द करून सध्याच्या अंशकालीन व कंत्राटी कर्मचार्‍याच्या सेवा आउटसोर्सिंग पद्धतीने भरण्याचे शासन निर्णय रद्द करून त्यांची सेवा नियमित करावी, मुदतपूर्व सेवानिवृत्ती जाचक धोरण रद्द करावे.

श्रमिक कामगार कर्मचारी देशोधडीला लावणारे नवीन कायदे रद्द करावे. केंद्रीय कर्मचारी यांना देय ठरणारे सर्व भत्ते सर्व कर्मचारी यांना मंजूर करावे.

सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरावी व ही पदे भरतांना अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या विनाअट कराव्या. चतुर्थश्रेणी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी प्रश्न तात्काळ सोडवावा. वेतन त्रुटी दूर करण्यासंदर्भात बक्षी समितीच्या अहवालाचा खंड दुसरा तात्काळ जाहीर करावा.

अन्यायकारक शेतकरी कायदे रद्द करावे, दरमहा 7 हजार 500 रुपये बेरोजगार भत्ता मंजूर करावा व प्रत्येक गरीब नागरिकास दरमहा 10 किलो अन्नधान्य पुरवठा करावा. प्रत्येक गरजू व्यक्तीला मनरेगामार्फत किमान 200 दिवसांचा रोजगार मिळेल असे धोरण लागू करावा. इतर सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व सबंधित संवर्ग संघटनेचा प्रतिनिधीसोबत निर्णायक चर्चा करावी.

राष्ट्रीय शिक्षण प्रणाली धोरण निश्चित करावी. आदिवासी नक्षलग्रस्त जिल्ह्यातील दि. 6 ऑगस्ट 2002 नुसार एकस्तर व प्रोत्साहन भत्याचे लाभ कायम ठेऊन कमी होणारे वेतन मान तात्काळ थांबविण्यात यावे.

कोविड 19 या आजाराचा वैद्यकीय प्रतीपूर्तीच्या यादीत समावेश करण्यात यावा आदी मागण्यांसाठी उद्या दि. 26 रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप करण्यात येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या