Wednesday, April 2, 2025
Homeनंदुरबारनंदुरबार : नवापूर शहरातील मार्केटमधुन ६ क्विंटल कांद्याची चोरी

नंदुरबार : नवापूर शहरातील मार्केटमधुन ६ क्विंटल कांद्याची चोरी

नंदुरबार | प्रतिनिधी

नवापूर शहरातील मार्केट मधुन ३२ हजाराच्या कांद्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी नवापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवापूर शहरातील नया होंडा गावाच्या पुलाजवळील मार्केटमधील मोकळया जागेत व्यापारी इमरान अत्तरखान पठाण यांच्या कांदे व बटाट्याच्या गोण्या ठेवलेल्या होत्या.अज्ञात चोरट्यांनी दि.१३ डिसेंबर रोजी २ वाजेच्या सुमारास ३२ हजार रूपये किमंतीच्या १२ गोण्या प्रति गोणी ५० किलो प्रमाणे व १८५० रूपये किमंतीची ५२ किलो वजनाची बटाट्याची गोणी असा ऐकुन ३३ हजार ८५० रूपयांचा माल लंपास केला.याप्रकरणी इमरान अत्तरखान पठाण रा.नारायणपुर,नवापूर यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि शिंपी करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident News : श्रीरामपूरात दोन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपूर-नेवासा रोडवर काल विविध ठिकाणी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये तिन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये पतीपत्नी तर एका डॉक्टराचा समावेश आहे....