Monday, October 12, 2026
HomeनगरAhilyanagar : आदिशक्तीचा आजपासून जागर; पूजासाहित्य खरेदीसाठी महिलांची लगबग

Ahilyanagar : आदिशक्तीचा आजपासून जागर; पूजासाहित्य खरेदीसाठी महिलांची लगबग

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शक्तीची उपासना, साधना असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज रविवारी (दि. 11) प्रारंभ होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घटस्थापनेच्या तयारीला वेग आला असून, पूजेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत महिलांची लगबग सुरू आहे. पूजासाहित्याची दुकाने, फुलांची दुकाने, तसेच पूजेच्या वस्तू विक्रीच्या ठिकाणी ग्राहकांची वर्दळ वाढलेली होती. पंचांगातील तिथींच्या विशेष संयोगामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवात रविवारी (दि. 11) घटस्थापना होत असून सोमवारी (दि. 19) अष्टमी आणि नवमीचे पूजन एकाच दिवशी केले जाणार आहे. त्यानंतर मंगळवारी (दि. 20) विजयादशमी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे नवरात्रातील विविध धार्मिक विधींचे नियोजन करताना भाविकांनी तिथींकडे बघायला हवे, असे ज्योतिषाचार्यांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आल्याने सोमवारी (दि. 19) दुर्गाष्टमी पूजन, संधीपूजा, महागौरी व सिद्धिदात्री देवीची आराधना, हवन आणि कन्यापूजन या विधींना महत्त्व राहणार आहे. नवरात्रोत्सवात देवीची स्थापना करून नऊ दिवस उपवास, जप, नामस्मरण, देवीस्तोत्र पठण, होमहवन आणि जागरणाच्या माध्यमातून आदिशक्तीची आराधना करण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारपेठेतून देवीस्तोत्र, आदिशक्तीचे दुर्गा सप्तशती, नवदुर्गा पाठ, दुर्गा स्तुती अशा धार्मिक पुस्तके घेण्याकडे महिलांचा कल वाढलेला असून, विविध पूजेचे साहित्य घेण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.

विविध देवी मंदिरे आणि घरोघरी घटस्थापनेच्या तयारीला वेग आला असून, नवरात्रोत्सवाचे भक्तिमय वातावरण निर्माण होत असलेले दिसून येत आहे.
शारदीय नवरात्रोत्सवात अश्विन शुद्ध प्रतिपदेला शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना करावी. ज्या भाविकांना शक्य आहे, त्यांनीच नऊ दिवस उपवास करावा. जप, नामस्मरण आणि देवीस्तोत्र पठणातून आदिशक्तीची आराधना करावी. शक्तीची उपासना, साधना आणि जागराचा उत्सव भक्तिभावाने साजरा करावा, असे सल्ला ज्योतिष विभागाकडून देण्यात आला.

मोहटा, कोल्हार, राशीन, अमरापूरला जागर
नगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी, राहाता तालुक्यातीज कोल्हार भगवती, राहुरी तालुक्यातील मनोरी, शेवगाव तालुक्यातील अमरापूर, कर्जत तालुक्यातील राशीन, निघोजची मळगंगा या ठिकाणी नऊ दिवस भव्य यात्रा उत्सव आणि देवीच्या जागरचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कामाख्या (उत्तराखंड) ते श्रीलंक यास माहूर, तुळापूर या शक्तीपाठावरून मोठा प्रवास करत ज्योत आणण्यात आलेली आहे.

उत्सवावर दुष्काळाचे सावट
यंदा जिल्ह्यात संपूर्ण पावसाळ्यातील चार महिन्यांत 66 ते 70 टक्केच पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातील उत्तरेतील विशेष करून राहुरी, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, कोपरगाव, दक्षिणेतील नगर, शेवगाव, पाथर्डी आणि कर्जत तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यातील मोठी धरणे अथवा पाणी प्रकल्पात मुबलक पाणी असले तरी मध्यम व लहान प्रकल्प कोरडे आहेत. जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळाचे सावट असून त्याचा परिणाम नवरात्री उत्सवासह दिवाळीवर होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : उमेदवारीसाठी एकमेकांना वाकुल्या; माघारीच्या डेडलाईनकडे लक्ष

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारीसाठी अवघे दहा दिवस उरले असताना राजकीय गणितांना वेग आला आहे. बिनविरोध निवडणुकीसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असतानाच...