Friday, November 13, 2026
HomeनगरPathardi : नवरात्रोत्सवासाठी मोहटादेवी गड सज्ज; आज घटस्थापना

Pathardi : नवरात्रोत्सवासाठी मोहटादेवी गड सज्ज; आज घटस्थापना

राज्यभरातून महिला भाविक गडावर दाखल || 100 एसटी बसेसचे नियोजन, मंदिर परिसर सजला

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शारदीय नवरात्रोत्सवासाठी श्रीक्षेत्र मोहटादेवी गड सज्ज झाला आहे. रविवारी (दि. 11) सकाळी 11 वाजता श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष तथा धर्मादाय उपआयुक्त नवनाथ जगताप यांच्या हस्ते घटस्थापना होणार असून, त्यानंतर नऊ दिवसीय उत्सवाला प्रारंभ होईल. राज्यभरातून महिला भाविक घटी बसण्यासाठी गडावर दाखल होत आहेत.

- Advertisement -

भाविकांसाठी मोफत महाप्रसाद, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, भक्तनिवास, वाहनतळ, दर्शनमार्ग, मंडप, पथदिवे आणि सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आली आहे. भजन, कीर्तन, महाआरती, कुमारिका पूजन, सुवासिनींची ओटी भरणे आणि कुंकुमार्चन असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. नारळ, पेढे, साड्या-चोळ्या व फुलहारांची दुकानेही सजली आहेत.

देवस्थानचे अध्यक्ष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त विशाल शेंडे, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र धस, विश्वस्त बाबासाहेब दहिफळे, शुभम दहिफळे, शशिकांत दहिफळे, अशोक दहिफळे, राजेंद्र शिंदे, अ‍ॅड. विक्रम वाडेकर,अ‍ॅड. कल्याण बडे, अ‍ॅड. प्रसन्न दराडे, श्रीकांत लाहोटी, अ‍ॅड. ऋतिका कराळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे उत्सवाच्या नियोजनात सहभागी आहेत.

पाथर्डी एसटी आगाराने जिल्ह्यातील विविध आगारांमधून 100 एसटी बसचे नियोजन केले आहे. गर्दीनुसार बसफेर्‍या वाढविण्यात येणार असून, गडाच्या पायथ्याशी तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे. तालुक्यातील देवी मंदिरांतही तयारी पूर्ण मोहटादेवी गडासह धामणगाव देवी, दगडवाडी, तोंडोळी, वडगाव, तिसगाव, खांडगाव, रेणुकाईवाडी आणि कोल्हार येथील देवी मंदिरांत घटस्थापना होणार आहे. पाथर्डी शहरातील गाडगे आमराई, तिवळण येथील तेली समाजाचे तुळजाभवानी मंदिर, चौडेश्वरी गल्ली, अष्टवाडा येथील चौंडेश्वरी मंदिर, चिंचपूर रस्त्यावरील रेणुकामाता मंदिर, चांदगाव रस्त्यावरील चौडाळेश्वरी मंदिर आणि साखरे वस्ती येथील तुळजाभवानी मंदिरांत आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवामुळे तालुक्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
भाविकांच्या सुरक्षेसाठी 34 पोलीस अधिकारी, पुरुष व महिला मिळून 241 पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, गाभारा बंदोबस्तासाठी आठ कर्मचारी, एक फिरते पोलीस पथक आणि 100 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. देवस्थानचे सुरक्षारक्षकही बंदोबस्तात सहभागी आहेत.

ताज्या बातम्या

पडसाद : शिर्डीला गर्दी पेलवते; त्र्यंबकलाच का गडबड होते?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि कोटी कोटी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना सुरक्षा रक्षकांकडून मारहाण,...