Saturday, May 18, 2024
Homeक्रीडानावा चषक क्रिकेट स्पर्धांच्या जर्सीचे अनावरण

नावा चषक क्रिकेट स्पर्धांच्या जर्सीचे अनावरण

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक अ‍ॅडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (NAWA)च्या वतीने आयोजित व सम्राट ग्रूप प्रायोजित ‘नावा प्रिमियर लिग (NPL) खेळाडूंसाठी मधुरा ग्रुपच्या सौजन्याने देण्यात येणाऱ्या जर्सी (टी शर्टस्)चे अनावरण आज मधुरा ग्रुपच्या सर्वेसर्वा संपदा हिरे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल पगार तसेच सम्राट ग्रुपचे अविनाश आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक सम्राट ग्रुप आहेत. परवा (दि. १) आणि २ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेपासुन महात्मानगर क्रिकेट मैदानावर या स्पर्धा पार पडणार आहे.

- Advertisement -

स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले आहेत.ए-गटा मध्ये १) टाईम्स ग्रुप २) पुण्यनगरी ३) दिव्य मराठी बी-ग्रुप मध्ये १) लोकमत २) सकाळ १) देशदुत सी -ग्रुप मध्ये १) लोकनामा २) पुढारी ३) रेड एफ एम तसेच डी -ग्रुप मध्ये १) रेडीओ मित २) नावा ३) जनस्थान या संघांचा समावेश आहे.

या साखळी सामन्यामध्ये प्रत्येक संघाचे दोन व प्रत्येक ग्रुपचे तीन असे १२ सामने खेळले जातील. त्यापैकी चारही ग्रुप मधील अव्वल संघांमध्ये उपांत्य सामना व अंतिम सामना होईल. एनपीएलचे सहप्रायोजक आयव्होक ऑप्टिकल अ‍ॅन्ड विजन केअर, युनिफार्म पार्टनर मधुरा ग्रुप, ट्रॉफी पार्टनर सिंग वारियर्स व मिडीया अ‍ॅडव्हर्टायझींग,गिफ्ट पार्टनर सोनी गिफ्टस्, फुडस् पार्टनर एन. राका. अ‍ॅडव्हर्टायझींग, नवांकुर पब्लिसीटी, टॉस पार्टनर मयुर अलंकार, पिंगळे पब्लिसिटी, मॉ अ‍ॅडव्हर्टायझींग, एखंडे अ‍ॅण्ड असोसिएट, गंगोत्री इस्टेट अ‍ॅण्ड डेव्हलपर्स, श्री साक्षी अ‍ॅडव्हर्टायझींग, प्रतिबिंब आर्ट इफेक्ट, कृषीदूत बायो हर्बल, ओेमपुजा इलेक्ट्रॉनीक, वेध न्यूज, हायटी साठी पेटुमल समोसावालाचे संचालक अमोल कलंत्री यांचे सहकार्य लाभले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांनी ग्राऊंड उपलब्ध करून दिले आहे. गेल्या १६ वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी नावाच्या वतीने क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत विजयी ठरणार्‍या संघाला नावा चषक प्रदान केला जातो. उत्कृष्ट बॅटसमन, उत्कृष्ट बॉलर, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज यांसारखी बक्षिसे दिली जातात. मिडिया जगतामध्ये या स्पर्धांविषयी विशेष औत्सुक्य असते. स्पर्धेसाठी सर्व संघांची जोरदार तयारी आहे.

जर्सी अनावरण प्रसंगी स्पर्धा समिती प्रमुख रवि पवार,सचिन गिते व नावाचे अध्यक्ष प्रवीण चांडक, संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे, मा. सरचिटणीस दिलीप निकम, सरचिटणीस मिलींद कोल्हे पाटील, राजेश शेळके, विठ्ठल देशपांडे, गणेश नाफडे, दिपक जगताप, प्रताप पवार, श्रीकांत नागरेे , सुनील महामुनी, अमोल कुलकर्णी, विठ्ठल राजोळे, शैलेश दगडे, शाम पवार, नितीन शेवाळे, दिनेश गांधी, रविराज खैरनार, तसेच वृत्तपत्र प्रतिनिधी देशदुतचे महाव्यवस्थापक अमोल घावरे, ग्रामीण व्यवस्थापक सचिन कापडणे, सुशील झगडे प्रवीण सचान, सुनिल पाटील, चैतन्य बोडके, अबिद शेख, अभिजित गोरे, बंटी पवार, प्रल्हाद इंदोलीकर, राम आढाव, सचिन जैन, विजय क्षिरसागर, सागर अहिरे, पंकज ठाकूर, अभय ओझरकर, रवी जन्नवार, सुहास भोसले, सचिन शिंदे, प्रफुल्ल पगार, प्रसाद चौधरी, श्रीराम शिंदे, प्रशांत नागरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या