मुंबई | Mumbai
महिनाभरापूर्वी अजित पवारांच्या (Ajit Pawar’) नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीतील (NCP) एका गटाने बाहेर पडत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. अजित पवार गटाच्या (Ajit Pawar Group) या निर्णयामुळे राष्ट्रवादीत मोठी फुट असून राष्ट्रवादी पक्ष दोन गटात विभागला गेला आहे…
Eknath Shinde : “एकनाथ शिंदे एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री झालेले नाहीत”; आमदार भरत गोगावलेंचे जाहीर सभेत विधान
या फुटीमुळे राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये देखील दोन गट पडले असून काही आमदार अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. तर काहींनी शरद पवारांसोबत (Sharad Pawar) एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच आता आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी नुकतीच जामिनावर सुटका झालेले राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक (MLA Nawab Malik) यांनी ते नेमके शरद पवार की अजित पवार गटासोबत जाणार याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
धक्कादायक! अल्पवयीन मुलीची तरुणाकडून चाकूने सपासप वार करत हत्या
नवाब मलिक यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, “मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहणार आहे”, असे ते म्हणाले आहेत. तसेच गेल्या १८ महिन्यांच्या काळात माझ्या कुटुंबासह (Family) मला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मूत्रपिंडाच्या गंभीर आजारामुळे मलाही त्रास सहन करावा लागला, असेही नवाब मलिक म्हटल्याची माहिती समोर आली आहे.
Maharashtra Rain Update : राज्यात आजपासून पावसाचे पुनरागमन? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय, वाचा सविस्तर
याशिवाय “सध्याच्या घडीला आरोग्याची काळजी घेणे, हे माझ्यासाठी प्राधान्य आहे. शहरातील सर्वात चांगल्या डॉक्टरांकडून मी उपचार घेणार आहे. पुढील महिनाभरात माझी प्रकृती सामान्य होईल, अशी मला आशा आहे”, असेही मलिक यांनी म्हटल्याचे समजते. दरम्यान, नवाब मलिक यांच्या विधानावरून ते अजित पवार गटात सामील होणार नाहीत, असे संकेत मिळत आहेत.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
Niphad News : करवाढ मागे घेण्यासाठी नागरिकांचे उपोषण