Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यानवाब मलिकांचा NCB वर नव्या आरोपांचा बॉम्ब; ऑडिओ क्लिप केली जाहीर

नवाब मलिकांचा NCB वर नव्या आरोपांचा बॉम्ब; ऑडिओ क्लिप केली जाहीर

मुंबई | Mumbai

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी पुन्हा एकदा एनसीबीवर (ncp) आरोपांचा बॉम्ब टाकला आहे. फर्जीवाडा करून लोकांवर खोटे आरोप लावले, लोकांना अडकवण्यात आलं असं म्हणत नवाब मलिक यांनी आज एक ऑडिओ क्लीप (audio clip) समोर ठेवली आहे. तसेच भाजपावर (bjp) एक गंभीर आरोप केला आहे.

- Advertisement -

पत्रकार परिषदेत बोलताना मलिक म्हणाले, गेल्या वर्षी २ ऑक्टोबर म्हणजे आर्यन खान केसपासून एनसीबीकडून सुरू असलेला फर्जिवाड्याचा पर्दाफाश केला. आर्यन खान केसमधील केपी गोसावी, भानुषाली, कागदांवर सह्या घेणं, २५ कोटींची खंडणी या सगळं समोर आणलं आहे. त्यावर एनसीबीने चौकशीसाठी खात्यातंर्गत चौकशी समिती नेमली. एसआयटी नियुक्त करण्यात आली, त्याचं काय झालं अजून कुणाला माहिती नाही, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला.

तसेच, आमच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला. मी कोर्टाच्या आदेशानुसार सर्व पुरावे कोर्टात सादर केले. त्यावेळी न्यायालयाला मी हे देखील विचारलं होत की मला एनसीबी जर काही चुकीचं काही करत असेल तर त्याविरोधात बोलण्याचा अधिकार आहे का तर त्याला हो असं उत्तर मिळालं होतं. असाही त्यांनी म्हंटल आहे.

तसेच एनसीबीकडून फक्त समीर खान याच्याच जामिनाविरोधात अपील करण्यात आल्यावर नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला. मुख्य आरोपी करन सजनानी आहे. ६ आरोपी आहेत. मग फक्त समीर खानच्याच विरोधात अपील का केली गेली? करण सजनानीच्या घरून हा माल पकडला गेला. गांजा म्हटले, पण तंबाखू होती. राहिला फर्नीचरवालाच्या विरोधात अपील केली नाही. फक्त समीर खानच्या विरोधात अपील करून प्रसिद्धीचा खेळ सुरू केला गेला. हे सगळं मला घाबरवण्यासाठी हे सगळं केलं जातंय, असं नवाब मलिक म्हणाले.

ज्या पद्धतीने शाहरूख खानच्या मनात भीती निर्माण करण्याचा उद्योग केला. माझ्या कुटुंबियांच्या मनात भीती निर्माण करण्याचा उद्योग केला. नवाब मलिक घाबरणार नाही. नवा फर्जिवाडा समोर आणतोय. एजन्सीबद्दल काही असेल, तर मला बोलण्याचा अधिकार असल्याचं न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे आणि त्याच अधिकारात मी बोलतोय. समीर वानखेडे आणि पीटी बाबूने पंचनामा बदलण्याचा कारनामा केला आहे. त्यावर काय कारवाई करणार आहात, याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे, असा हल्लाबोल मलिक यांनी केला.

तसेच नवाब मलिक यांनी यावेळी दोन ऑडिओ क्लिप ऐकवून एनसीबी आणि समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले. एनसीबीकडून कशा प्रकारे बोगस कारवाया केल्या जातात हे त्यांनी सांगितले. या ऑडिओ क्लिपमध्ये मॅडी नावाचा पंच आहे आणि त्याला किरण बाबू नावाच्या अधिकाऱ्याने फोन केला. एका जुन्या प्रकरणात पंचनाम्यावर सही कर आणि आमच्या समक्ष पंचनामा केला आहे, कारवाईची प्रक्रिया केली आहे, असे त्यात आहे, असे तो अधिकारी सांगत आहे. त्यावर मॅडी नावाची व्यक्ती घाबरून जाते. त्यानंतर मलिक यांनी दुसरीही ऑडिओ क्लिप ऐकवली. यानंतर त्यांनी समीर वानखेडे आणि पंचामध्ये बोलणे झाल्याचा दावा करत गंभीर आरोप केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या