जेव्हापासून सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात (SSR Sucide case) ड्रग्ज अँगल (Drug case) समोर आला होता. तेव्हापासून बॉलीवूडच्या (bollywood) कलाकारांची लांबलचक यादीच NCB च्या तपासातून समोर आली होती. या प्रकरणात अनेक जणांवर NCB ने कारवाई केली आहे. यात काही अभिनेता आणि अभिनेत्रींचा देखील समावेश आहे.
रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)
रिया चक्रवर्तीला अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर समोर आलेल्या अमली पदार्थाप्रकरणी सप्टेंबर २०२० मध्ये रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. सुशांतला अमली पदार्थ पूरवल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. यावेळी तिच्या भावाला देखील अटक करण्यात आली होती. नंतर या दोघांची सुटका जामिनावर करण्यात आली.
हिना पांचाळ (Heena Panchal)
नाशिकला एका पार्टीमध्ये NCB ची धाड पडली होती. त्यावेळी पार्टीमधून २२ लोकांना अटक करण्यात आली. यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री हिना पांचाळचे देखील नाव होते.
प्रीतीका चौहान (Preetika Chauhan)
टीव्ही स्टार प्रीतीका चौहानलाही ऑक्टोबर २०२० मध्ये सोबत गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. काही कालावधीनंतर तिलाही जामीन मंजूर करण्यात आला.
भारती सिंग – हर्ष लिंबाचिया (Bharti Singh Harsh Limbachia)
NCB ने नोव्हेंबर २०२० मध्ये कॉमेडीयन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांच्या घरी धाड टाकली होती. यावेळी त्यांना त्यांच्या घरी काही अमली पदार्थ सापडले होते. त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली होती. त्यांच्या कडून तब्बल ८६.५ ग्राम गांजा जप्त करण्यात आला होता.
शबाना सईद नाडियावाला (Shabana Saeed Nadiadwala)
फिरोझ नाडियावालाची बायको शबाना सईद हिला नोव्हेंबर २०२० मध्ये NCB ने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिला मुंबईतल्या कोर्टाने जामीन मंजूर केला.
फरदीन खान (Fardeen Khan)
अभिनेता फरदीन खानला ड्रग्ज प्रकरणात (drug case) अटक करण्यात आली. फरदीन खान कोकेन खरेदी करण्यासाठी गेला होता.
अरमान कोहली (Arman Kohli)
अभिनेता अरमान कोहलीला ऑगस्ट २०२१ मध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. NCB ला त्याच्याकडून १.२ ग्रॅम कोकेन सापडलं होतं. त्याचा जामीन फेटाळण्यात आला. अर्जुन रामपाल अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गैब्रिएलाच्या भावाला नुकतेच NCB ने अटक केले आहे. अगिसिलाओस जवळ अमली पदार्थ सापडले होते, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. अगिसिलाओसला याप्रकरणी गोवा येथून पकडण्यात आले. गैब्रिएलाच्या भावाला या आधी देखील NCB ने अमली पदार्थाप्रकरणी अटक केली होती.
कपिल झावेरी (Kapil Jhaveri)
कपिल झावेरीला गोव्यातील (Goa) त्याच्या निवासस्थानी अमली पदार्थाप्रकरणी अटक करण्यात आली होती. यावेळी तो त्याच्या गोव्यातील एका निवासस्थानी पार्टी करत होता. तेव्हा त्याच्याबरोबर आणखी २३ लोकांना देखील अटक करण्यात आली होती. करोना (COVID19) काळात सुरू असलेल्या या पार्टीमध्ये ९ लाखांहून अधिक अंमली पदार्थ जप्त केले होते.