जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना राजकीय वैमनस्यातून हनीट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी एका महिलेला सुपारी दिल्याप्रकरणी अभिषेक पाटील यांनी रामानंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत खुद्द अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली आहे.
या तक्रारीप्रकरणी अभिषेक पाटील यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, मी, 15 जानेवारी 2020 पासून राष्ट्रवादीचा महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत आहे.
दरम्यान, 15 ऑक्टोंबर रोजी शरद पवार यांची भेट घेवून मी, मुंबई येथून परतत असतांना माझ्या 976973333 या नंबरवर रात्री 9 वाजता एका महिलेचा फोन आला. त्यावेळी त्या महिला मला म्हटल्या की, अभिषेकभाऊ मला आपल्याशी पर्सनल काम आहे. मला आपली भेट घ्यायची आहे.
मी, त्यांना उद्या सकाळी 11.30 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात यावे असे सांगितले. त्यांनी दुसर्या दिवशी मला राष्ट्रवादीचे कार्यालय बंद असल्याचे सांगितल्याने मी त्यांना रिंगरोडवरील माझ्या कार्यालयात येण्यास सांगितले.
दरम्यान त्या, महिलेने भेटल्यानंतर मला सांगितले की, माझ्याकडे तुमचे एक काम आले आहे. परंतू ते मी करणार नाही.
कारण, तुम्ही खुप चांगले काम करीत आहात. मी तुमचे राजकीय आयुष्य उध्दवस्त करु इच्छित नाही. त्या महिलेने मनोज वाणी नामक व्यक्तीने मला अॅडव्हॉन्स पैसे देवून इतर मुलींमार्फत तुमचे अश्लिल फोटो व व्हिडीओ काढून बलात्काराचा आरोप करण्यास सांगितले आहे.
दरम्यान याप्रकारामागे कोणीतरी मोठा राजकीय व्यक्ती असल्याचे व माझे सामाजिक, राजकीय व कौटूंबिक जीवन संपविण्याचे हे रॅकेट असल्याचे अभिषेक पाटील यांनी सांगितले.
मला भेटण्यापुर्वी सदरहू महिला एका नगरसेवकास भेटली असता, त्या नगरसेवकाने असे चुकीचे काम करु नये असा सल्ला सदरहू महिलेला दिल्यामुळे ती महिला माझ्याकडे आली. यासंबंधीत महिलेला पाच लाखांची सुपारी देण्यात आली असून त्यापैकी 50 हजार रुपये अॅडव्हॉन्स देण्यात आले आहे.
या महिलेवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात यापुर्वी चोरी व तस्सम गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. दरम्यान मी, महापालिकेच्या कचरा प्रकरणाचा घोटाळा समोर आणल्यामुळेदखील माझ्याबाबतील असे प्रकार होत असल्याचा आरोप अभिषेक पाटील यांनी केला आहे. दरम्यान याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली आहे.