Saturday, October 19, 2024
HomeराजकीयNCP Candidate list : मतदारसंघ ठरले, उमेदवार ठरले! राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी...

NCP Candidate list : मतदारसंघ ठरले, उमेदवार ठरले! राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर

मुंबई | Mumbai

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीची संभाव्य उमेदवार यादी

  • अजितदादा पवार – बारामती
  • छगन भुजबळ – येवला
  • हसन मुश्रीफ-कागल
  • धनंजय मुंडे – परळी
  • नरहरी झिरवाळ – दिंडोरी
  • अनिल पाटील – अमळनेर
  • राजू कारेमोरे – तुमसर
  • मनोहर चंद्रीकापुरे – अर्जुनी मोरगाव
  • धर्मरावबाबा आत्राम – अहेरी
  • इंद्रनील नाईक – पुसद
  • चंद्रकांत नवघरे – वसमत
  • नितीन पवार – कळवण
  • माणिकराव कोकाटे – सिन्नर
  • दिलीप बनकर – निफाड
  • सरोज अहिरे – देवळाली
  • दौलत दरोडा – शहापूर
  • अदिती तटकरे – श्रीवर्धन
  • संजय बनसोडे – उदगीर
  • अतुल बेनके – जुन्नर
  • दिलीप वळसे पाटील – आंबेगाव
  • दिलीप मोहिते – खेड – आळंदी
  • दत्तात्रय भरणे – इंदापूर
  • यशवंत माने – मोहोळ
  • सुनिल शेळके – मावळ
  • मकरंद पाटील – वाई
  • शेखर निकम – चिपळूण
  • अण्णा बनसोडे – पिंपरी
  • सुनिल टिंगरे – वडगाव शेरी
  • राजेश पाटील – चंदगड
  • चेतन तुपे – हडपसर
  • किरण लहामटे – अकोले
  • संजय शिंदे – करमाळा
  • देवेंद्र भुयार – मोर्शी
  • आशुतोष काळे – कोपरगाव
  • संग्राम जगताप – अहमदनगर शहर
  • जयसिंह सोळंके – माजलगाव
  • बाबासाहेब पाटील – अहमदपूर
  • सना मलिक – अणुशक्तीनगर
  • नवाब मलिक – शिवाजीनगर मानखुर्द
  • अमरावती शहर – सुलभा खोडके
  • इगतपुरी – हिरामण खोसकर

एकीकडे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आला असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचा (Mahavikas Aaghadi) जागावाटपाचा (Seat Sharing) तिढा अजूनही सुटलेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत आतापर्यंत काँग्रेस १०३ जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ८५ जागा, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ९० जागा मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण २७८ जागांवरील तिढा सोडविण्यात मविआला यश आल्याचा दावा करण्यात येत असून विदर्भातील १० जागांवर घोडं आडल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या