Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजNCP Ajit Pawar Manifesto: लाडक्या बहिणींचे १५०० वरुन २१०० रुपये, २.५ दशलक्ष...

NCP Ajit Pawar Manifesto: लाडक्या बहिणींचे १५०० वरुन २१०० रुपये, २.५ दशलक्ष नोकऱ्या, अजित दादांचा वादा; राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिध्द

मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठा वादा केला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. या जाहीरनाम्यामध्ये १० हमी देण्यात आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यास लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येणार असल्याचे सुनील तटकरेंनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० वरून २१०० रुपये देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलेले आहे. शेतकरी कर्जमाफी, भात शेतकऱ्यांसाठी २५००० रूपये प्रति हेक्टर बोनस, २.५ दशलक्ष नोकऱ्या आणि ग्रामीण भागात ४५००० ‘पाणंद’ रस्त्यांचे बांधकाम करण्याची आश्वासने अजित पवारांनी जाहीरनाम्यात दिलाय.

- Advertisement -

मतदानाचा आशीर्वाद मिळाल्यास या वचनांची निश्चित अंमलबजावणी करु असे सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. “भगिनींना समर्पित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मासिक रकमेत वाढ करण्याचे आश्वासन आम्ही देत आहोत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या १५०० रुपये देण्यात येत आहे. नोव्हेंबरपर्यंत महिलांच्या खात्यात ७००० रुपये जमा झालेले आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुती विजयी झाल्यास या मासिक रकमेत ६०० रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र महिलांना महिन्याला २१०० रुपये मिळणार आहेत. ही महाराष्ट्राच्या इतिहासातील महिलांसाठी महत्त्वाची योजना ठरणार आहे. महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आलं तर २,३०,००००० महिलांना दरवर्षी २५ हजारहून अधिक रक्कम मिळेल. ज्यामुळे महिलांना मोठा आधार मिळणार आहे. महिलांना लाभ देण्याचे आम्ही वचन दिले आहे. पुन्हा निवडून आल्यास या हमीची पूर्तता करण्याचे आश्वासन आम्ही देत आहोत,” असे सुनील तटकरे यांनी म्हटले.

हे ही वाचा: Maharashtra Assembly Elections: भाजपचा बंडखोरांवर कारवाईचा बडगा; राज्यातील ‘इतक्या’ नेत्यांवर कारवाई

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात 11 नवीन आश्वासने आहेत, ज्यात वृद्धापकाळ निवृत्ती वेतन १५०० वरून २१०० प्रति महिना वाढवण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी, पक्षाने केंद्र आणि राज्य सरकारच्या समर्थनासह शेतकरी सन्मान निधी प्रतिवर्ष १२००० वरून १५००० पर्यंत वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. जाहीरनाम्यात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबाबत आणि एमएसपी अंतर्गत विकल्या गेलेल्या सर्व पिकांसाठी २०% अतिरिक्त अनुदान देण्याबाबतही सांगितले आहे.

“आम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ४५ हजाराहून अधिक ‘पाणंद’ रस्ते बांधण्याचा संकल्प केला आहे. ग्रामीण कृषी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ही सर्वात मोठी योजना आहे,’ असे जाहीरनाम्यात म्हटले आहे. इतर आश्वासनांमध्ये २.५ दशलक्ष नोकऱ्या निर्माण करणे आणि प्रशिक्षणाद्वारे १ दशलक्ष विद्यार्थ्यांना १०,००० मासिक स्टायपेंड प्रदान करण्याचे वचन दिले आहे. अंगणवाडी आणि आशा कर्मचाऱ्यांना १५००० मासिक वेतन देण्याचे वचन, सौर आणि अक्षय ऊर्जेला प्राधान्य देताना वीज बिल ३०% कमी करण्याचेही वचन देण्यात आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या