Tuesday, March 25, 2025
Homeमुख्य बातम्यातथ्यहीन! अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

तथ्यहीन! अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई | Mumbai

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अजित पवार केंद्रबिंदू ठरत आहेत. ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या वारंवार चर्चा होत आहेत. यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. कारण नसताना माझ्याबाबत जाणीवपूर्वक गैरसमज निर्माण करण्याचे काम होत आहे. बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.

- Advertisement -

ते म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या चर्चांना काही अर्थ नाही. कारण नसताना माझ्याबाबत गैरसमत पसरवले गेले. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात अनेक जण उष्माघाताने दगावले, अनेकांवर उपचार सुरू होते. मी त्या सर्वांची भेट घेतली. मोठ्या प्रमाणावर श्रीसदस्य आले, आदल्या दिवशीही अनेक जण आलेले आपल्याला दिसले असतील.

यात आम्हाला कुठल्याही प्रकारचे राजकारण करायचे नाही. परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर 13-14 कोटी रुपये खर्च केला जातो. मग एवढा खर्च केला तर मंडप टाकायला काय अडचण होती? याबाबत मी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, मृतांच्या कुटुंबीयांना 5-5 लाख रुपये देऊन त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा कार्यक्रम संध्याकाळीही घेता आला असता, असं माझं स्पष्ट मत आहे.

अजित पवार यांनी विधानभावनात आमदारांची बैठक बोलावली, अशी चर्चा देखील रंगली होती. यावर अजित पवार म्हणाले, सर्व आमदार विविध कामांसाठी आले होते. माझे काम देखी होते. कामासाठी सर्व आमदार भेटले, त्याचा वेगळा अर्थ काढू नका. महाविकास आघाडीच्या सभेत मी बोललो नाही तर बातम्या होतात. मात्र बाळासाहेब थोरात बोलले नाही तर बातम्या करता. माझ्यावर एवढ प्रेम का. तुम्हाला आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, असे अजित पवार म्हणाले.

४० आमदारांच्या सह्या घेतल्याचं बोललं जात आहे त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. कारण नसताना माझ्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. माझ्याबाबत सुरू असलेल्या वावड्यांमध्ये तथ्य नाही. मी कोणत्या आमदारांच्या सह्या घेतल्या नाही. आम्ही राष्ट्रवादी पक्षासोबतच आहोत. ४० आमदारांच्या कोणत्याही पत्रावर सह्या घेतलेल्या नाहीत, असं त्यांनी सांगितले.

मी आणि आमचे सर्व आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहोत आणि पुढेही राहणार आहोत. वेगवेगळ्या चॅनेलमध्ये वेगवेगळ्या पक्षाचे नेते आपले मत व्यक्त करत आहेत. त्यांनी आपापल्या पक्षाबाबत बोलावे, आमच्याबद्दल बोलू नये. आमचे वकीलपत्र दुसऱ्यांनी घेऊ नये. आमची भूमिका मांडण्यासाठी आमचे पक्षाचे नेते आहेत. त्यांना मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, पण यामुळे आमच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मी कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की, मी राष्ट्रवादीत पवार साहेबांसोबतच आहे., अशी स्पटोक्ती अजित पवारांनी केली. त्यामुळे आता त्या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...