नागपूर । Nagpur
महाराष्ट्रातील महायुती सरकाराचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे.
महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आले आहे. मात्र यामुळे मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल होते. अखेर आता अजित पवार दोन दिवस गायब का होते, याची माहिती समोर आली आहे.
अजित पवारांना घशाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे ते दोन दिवस आराम करत होते. यामुळे ते अधिवेशनात अनुपस्थित होते. मात्र आता दोन दिवसांनी अजित पवार हे विधिमंडळात दाखल होणार आहेत. आज अजितदादा विधी मंडळाच्या कामकाजात सहभागी होणार असल्याची माहिती देखील आमदार अमोल मिटकरी यांनी दिली. त्यापूर्वी त्यांच्या बंगल्यावर भेटण्यासाठी अंसख्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.
दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. यावर अजित पवार काय बोलणार हे महत्वाचं ठरलं आहे.