Sunday, November 17, 2024
Homeमुख्य बातम्यामुख्यमंत्र्यांपाठोपाठ शरद पवार यांनाही धमकीचा फोन

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ शरद पवार यांनाही धमकीचा फोन

मुंबई :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आला आहे. हा फोनही भारताबाहेरून आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. After Uddhav Thackeray, Sharad Pawar and Anil Deshmukh Receive Threat Call

- Advertisement -

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान ‘मातोश्री’वर फोनवरुन धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचे फोन आल्याची माहिती आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी हा फोन आला होता. गुन्हे विभाग या प्रकरणाचा तपास करत आहे. कंगना रनौतप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आले. मात्र त्यांना आलेला फोन मात्र भारतातून असल्याचे कळते.

काय म्हणाले होते गृहमंत्री

कंगना राणावतने मुंबईत आपले करिअर घडवले. मुंबईने कंगनाला ओळख दिली. त्याच मुंबईला भलेबुरे म्हणणाऱ्या कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे विधान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या