केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतलेल्या कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी विधेयकाला विरोध केल्यामुळे निलंबित झालेल्या राज्यसभा सदस्यांच्या समर्थनार्थ एक दिवस अन्नत्याग आंदोलन करणार शरद पवार करणार आहेत. उपसभापतींच्या विरोधात गांधीगिरीच्या मार्गाने आपली तीव्र भावना व्यक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पवार यांनी राज्यसभा उपसभापतींवर तसेच कृषी विधेयक संमत करण्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले, सभागृहात दोन ते तीन दिवस चर्चा होण्याची अपेक्षा होती. पण ही विधेयक तातडीने मंजूर करावी असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता. हे नियमाविरोधात असल्याचे सभापती सांगत नियमाचं पुस्तक वारंवार दाखवत होते. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ते फाडण्याचा प्रकार घडला,असे शरद पवार यांनी सांगितले.