शिर्डी । प्रतिनिधी
शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय अधिवेशन पार पडणार आहे. आजपासून या शिबिराला सुरुवात होणार आहे.
या शिबिराला सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाप्रमुख, पदाधिकारी, आमदार खासदार उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार शिर्डीमध्ये दाखल झालेत. यावेळी अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले.
दरम्यान या शिबिरात छगन भुजबळ उपस्थित राहणार आहे. नुकतंच ते शिर्डी विमानतळावर दाखल झाले आहे.चं आगमन झालेलं नाही. मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्यानंतर छगन भुजबळ कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांनी नाराजी बोलूनही दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट भुजबळांनी घेतली होती. त्यामुळे भुजबळ भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु, यानंतर शिर्डीत राष्ट्रवादीचे शिबिर सुरू झाले आहे. या शिबिराला भुजबळ हजर राहिले आहे.