Wednesday, May 6, 2026
Homeनगरराष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याने मागितली दरमहा 2 लाख खंडणी

राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍याने मागितली दरमहा 2 लाख खंडणी

पवनचक्की प्रकल्पाच्या सिक्युरिटी गार्डला मारहाण || पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील दरोडी येथील पवनचक्की प्रकल्पाच्या सिक्युरिटी गार्डला मारहाण करत दरमहा 2 लाखांची खंडणी मागितल्याची घटना दि.18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी सिक्युरिटी गार्ड राजेंद्र दौलत घुले (रा.कारेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष विकास राघु पवार (रा.राळेगण थेरपाळ) याच्यासह अनोळखी 7-8 जणांवर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फिर्यादीनुसार, 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिक्युरिटी गार्ड राजेंद्र घुले दरोडी शिवारातील कंपनीच्या कार्यालयात असताना विकास पवार तेथे आला. पवार याने गचांडी पकडून खुर्चीवरून खाली ओढत घुले यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्याच्या हातातील कोयता थेट गळयाजवळ रोखून तू येथे कसे काम करतोस? असे धमकावले. पवार हा मारहाण करत असताना त्याच्या पाठोपाठ 7 ते 8 जण काठया घेवून क आले. त्यांनी कार्यालयाच्या खिडकी, संगणक आणि ऑपरेटिंग सिस्टम व मोबाईलची तोडफोड केली.

व परत येथे कामाला आल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तुझ्या मालकाला सांग पवनचक्की चालवायची असेल तर दर महिन्याला दोन लाख रूपये मला द्यावे लागतील. पवारने घुले याच्या खिशातील 22 हजार रूपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. भांडणाचा आवाज ऐकून साईड इन्चार्ज किरण पवार हे घटनास्थळी आले आणि त्यांनी मारहाण थांबवली, असेही फिर्यादीत म्हटले आहे.

ताज्या बातम्या

वंदे

Vande Mataram: ‘वंदे मातरम्’ ला राष्ट्रगीता समान दर्जा; अवमान केल्यास ३...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiनुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर आणि पश्चिम बंगाल निवडणुकीतील विजयानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत...