Saturday, May 4, 2024
Homeनगरराष्ट्रवादीकडून निवडणूक तयारी

राष्ट्रवादीकडून निवडणूक तयारी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दिवाळीनंतर नगरसह राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने आतापासूनच तयारी सुरू केली असून या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील पक्षाचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी, प्रमुख आणि कार्यकर्त्यांशी रविवार (दि.18) रोजी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे संवाद साधणार असून आगामी निवडणुकांच्यादृष्टीने सूचना करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

- Advertisement -

रविवारी सायंकाळी साडे सहा वाजता नगरला राष्ट्रवादी भवन येथे पक्षाची बैठक होणार आहे. नगर जिल्हात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका आणि परिषदांच्या निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी जास्ती जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी पक्ष प्रयत्नशील आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार सत्तेतून गेल्यानंतर आगामी निवडणूकांमध्ये पुन्हा आघाडी होणार की नाही, याचे चित्र स्पष्ट नसल्याने स्वबळावर निवडणूका लढण्याची वेळ आल्यास अडचण नको, यासाठी आतापासून राष्ट्रवादीने कंबर कसली आहे.

सध्या राष्ट्रवादीचे सदस्य नोंदणी सुरू असून यावेळी बैठकीत तालुकानिहाय सदस्य नोंदणीचा आढावा प्रदेशाध्यक्ष आ. पाटील घेणार असल्याचे पक्षातील सुत्रांनी सांगीतले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादीची ताकद चांगली असून ती ताकद वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ. पाटील काय संदेश देणार याकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष राहणार आहेत.

शरद पवार श्रीगोंद्यात

दरम्यान, आज (शुक्रवारी) राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार हे श्रीगोंदा तालुका दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यात तालुक्यातील राजकीय स्थितीसह राज्यातील राजकीय परिस्थितीवर पवार काय भाष्य करणार, याकडे जिल्ह्याचेे लक्ष राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या