Friday, July 12, 2024
Homeमुख्य बातम्याजयंत पाटील यांनीसुद्धा आमच्यासोबत शपथ घेतली असती पण...; मुश्रीफांनी बाॅम्ब टाकला!

जयंत पाटील यांनीसुद्धा आमच्यासोबत शपथ घेतली असती पण…; मुश्रीफांनी बाॅम्ब टाकला!

कोल्हापुर | Kolhapur

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यानंतर अशाही चर्चा रंगल्या की, जयंत पाटील हे अजित पवार गटाच्या संपर्कात आहे. यावरुन आता पुन्हा एकदा हसन मुश्रीफ यांनी जयंत पाटलांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

जयंत पाटील एका घटनेमुळे बचावले, नाहीतर आमच्याबरोबर शपथ घेतली असती, याबाबत लवकरच गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा केला आहे. त्यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, जयंत पाटील एका गोष्टीमुळे आमच्यासोबत ते आले नाहीत, अन्यथा त्यांनी आमच्या सोबतच शपथ घेतली असती. ती गोष्ट नेमकी काय आहे ते मी वेळ आल्यावर स्पष्ट करेन.

राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून शरद पवारांचे निष्ठांवत म्हणून ओळख राहिलेल्या मुश्रीफ ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्यानंतर अजित पवार गटात सामील झाले आहेत. पीएम मोदी यांनी नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. मात्र, या टिकेला हसन मुश्रीफ यांनी मौन बाळगले. त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

याचवेळी त्यांनी मराठा समाजाच्या नागरिकांनी त्यांची गाडी अडवल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केले. मुश्रीफ म्हणाले, मराठा समाजाच्या नागरिकांनी आज सकाळी माझी गाडी अडवली, पण मी त्यांना समाधानकारक उत्तर दिले,पण आता शासनपातळीवर आपल्याला हा तिढा सोडवायला हवा. न्यायालयात टिकणारे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सरकारचा प्रयत्न आहे. हे चक्रव्ह्यू आपल्याला भेदावेच लागेल. यासाठी आम्ही मंत्रिमंडळातही समाजाच्या भावना मांडू आणि लवकरात लवकर आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करू. समाजाच्या भावना तीव्र आहेत, त्यांनी आंदोलन कसे करावे आणि कसे नाही हा त्यांच्या प्रश्न आहे. त्यात राजकारणही असण्याची शक्यता आहे. परंतु त्यांना आरक्षण देणे महत्त्वाचे आहे,असेही मुश्रीफ यांनी या वेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या