Friday, June 14, 2024
Homeमुख्य बातम्या“माझ्याबदद्ल गैरसमज पसरवले जात आहेत, कुठे गेलोच तर...”; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

“माझ्याबदद्ल गैरसमज पसरवले जात आहेत, कुठे गेलोच तर…”; जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई । Mumbai

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड होऊन अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यानंतर अनेक आमदार शरद पवारांना सोडून अजित पवारांबरोबर गेले आहेत. परंतु प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व त्यांच्या संबंधित आमदार हे शरद पवारांबरोबर राहिले आहेत.

परंतु जयंत पाटील शरद पवारांना सोडून जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. त्यातच पुणे दौऱ्यावर असलेले गृहमंत्री अमित शाह यांची जयंत पाटील यांनी भेट घेतल्याचे वृत्त देखील माध्यमांनी दिल होत. यावर आता स्वतः जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिल आहे.

मी मंत्री अमित शाह कधी भेटलो याचं संशोधन करा. चर्चा कोण करतंय त्यांच्याकडे चौकशी करा. मी कालही इथेच होतो आणि आजही इथेच आहे. मी पुण्याला कधी गेलो तुम्हीच सांगा, अस जयंत पाटील म्हणाले. तसेच, ज्या बातम्या येत आहे त्यातून माझी करमणूक होत आहे. माझ्याबद्दल गैरसमज यातून पसरत आहे. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. मी शरद पवार साहेबांशी रोज भेट घेत आहे. कुठे गेलोच तर तुम्हाला सांगेन, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या