Wednesday, December 4, 2024
Homeजळगावराष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ॲड.रोहिणी खडसे यांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ॲड.रोहिणी खडसे यांना अटक

जळगाव-jalgaon

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी जळगाव दौरावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी विविध मागण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालया बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

- Advertisement -

या ठिकाणी पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी देखील भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात सुरू असलेल्या बैठकीतून जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली.

तसेच राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, रिकु चौधरी, मंगला पाटील,वंदना चौधरी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांसोबत झटापट झाली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या