Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याआमदार अपात्र होणार हे लक्षात आल्यामुळेच...; बड्या नेत्याचा राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप

आमदार अपात्र होणार हे लक्षात आल्यामुळेच…; बड्या नेत्याचा राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात नाराजी व्यक्त केल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) अ‍ॅक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. राहुल नार्वेकर ठाकरे आणि शिंदेंना नोटीसा पाठविणार असल्याचे समजते.

- Advertisement -

शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात विलंब झाल्यामुळे राहुल नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

पीक विम्याची अग्रीम दिवाळीपूर्वी जमा करा – कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे निर्देश

शशिकांत शिंदे म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने सूचना केली असेल तर हे आमदार अपात्र होणार हे लक्षात आल्यानेच ते चालढकल करत आहेत. त्यामुळे अध्यक्षांनी तातडीने निर्णय दिला नाही तर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला पाहिजे.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या एका आंदोलनाला भेट दिल्यानंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नार्वेकर यांच्यावर टीका केली.

आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या मुदतीत निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने आधीच सांगितले आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले. सरकार आणि अध्यक्ष सुनावणीला उशीर करत आहेत. आमदार अपात्र होणार हे कायद्याने निश्चित झाल्यानंतरच त्यांच्याकडून सुनावणी घेऊन निर्णय घेण्याबाबत चालढकल होत आहे, अशी टीका त्यांनी यांनी केली.

धनगर आरक्षणाची बैठक निष्फळ

- Advertisment -

ताज्या बातम्या