Sunday, December 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजआमदार दत्तात्रय भरणेंकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काम करणाऱ्याला शिवीगाळ? रोहित पवारांकडून व्हिडिओ...

आमदार दत्तात्रय भरणेंकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काम करणाऱ्याला शिवीगाळ? रोहित पवारांकडून व्हिडिओ पोस्ट

मुंबई | Mumbai

देशात सध्या लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) धामधूम सुरु असून आज तिसऱ्या टप्प्यात देशातील १० राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील एकूण ९३ जागांसाठी मतदान (Voting) पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) ११ लोकसभा मतदारसंघांचा समावेश असून सकाळी सात वाजेपासून राज्यातील विविध मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेचे लक्ष बारामती लोकसभेतील लढतीकडे लागून आहे.

- Advertisement -

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी बारामती मतदारसंघातील इंदापूरचे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे ( MLA Dattatray Bharne) यांचा एका व्यक्तीला मतदान केंद्रावर शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ आपल्या एक्स (ट्वीटर) या सोशल मिडिया हँडलवर शेअर केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले आहे.

दरम्यान, सदर व्हिडिओमध्ये भरणे हे एका व्यक्तीशी भांडत असून त्या व्यक्तीला शिवीगाळ करत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. तुम्हाला माझ्याशिवाय कुणीच नाही. तुमच्या मदतीला बारामती अॅग्रोचा कुणीच येणार नाही. मलाच तुमच्या मदतीला यावं लागेल, असं भरणे त्या व्हिडिओमध्ये म्हणतांना दिसत आहेत. तसेच रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट करत भरणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

रोहित पवारांनी पोस्टमध्ये नेमकं काय म्हटले आहे?

केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडिओत बघा. विशेष म्हणजे ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहेत. ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही, असे रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या