Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजUttam Jankar: शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर अजित पवारांच्या भेटीला, कारण...

Uttam Jankar: शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर अजित पवारांच्या भेटीला, कारण काय?

मुंबई । Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर पुन्हा चर्चेत आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमवर आक्षेप घेत त्यांनी बॅलेट पेपरद्वारे मतदानाची मागणी सातत्याने केली आहे. त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.

- Advertisement -

आज सकाळी ११ वाजता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंत्रालयात भेट घेतली. दोघांमध्ये काही मिनिटे चर्चा झाली. जानकर यांनी ही भेट मतदारसंघातील कामांसाठी घेतल्याचे स्पष्ट केले आहे.या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, जानकर यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकांच्या निकालानतंर उत्तम जानकर यांनी अनेकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला आहे. यावरुन त्यांनी आंदोलनाचा इशारा देत आमदारकी सोडण्याची तयारीही दर्शवली होती. उत्तम जानकर यांच्याकडून सातत्याने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...