Thursday, September 19, 2024
Homeमुख्य बातम्याAjit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण; खासदार प्रफुल्ल पटेल...

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण; खासदार प्रफुल्ल पटेल यांची माहिती

मुंबई | Mumbai

- Advertisement -

सध्या राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर विविध ठिकाणी आंदोलने सुरु असून अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. काल अजित पवार (Ajit Pawar) बारामती तालुक्यातील (Baramati Taluka) माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले होते. यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेतल्याने अजित पवारांनी हा दौरा स्थगित केल्याचे बोलले जात होते.

अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काल डेंग्यू (Dengue) झाल्याचे निदान झाले असून त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय उपचार आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे, असे ट्विट राष्ट्रवादी-अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले आहे. तसेच प्रकृतीत सुधारणा झाल्यावर अजित पवार पुन्हा कामाला सुरुवात करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

नांदगाव तालुक्यात मोठी कारवाई; देहव्रिक्री रॅकेटचा पर्दाफाश

यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे की, अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्यावरून प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या दिल्या जात आहेत. मी हे स्पष्ट करू इच्छितो की कालपासून त्यांना डेंग्यूचे निदान झाले आहे आणि त्यांना पुढील काही दिवस वैद्यकीय मदत आणि विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. अजित पवार हे त्यांच्या जनसेवेच्या जबाबदाऱ्यांसाठी कटिबद्ध आहेत. एकदा ते पूर्णपणे बरे झाले की, ते आपली समर्पित सार्वजनिक कर्तव्ये पुढे चालू ठेवण्यासाठी पूर्ण शक्तीने परत येतील, असे पटेल आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्यभरात राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची कोंडी झाली असून हा प्रश्न पुन्हा एकदा राज्यात चिघळण्याची शक्यता आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Fire News : लासलगाव येथे कॉम्प्लेक्सला भीषण आग; लाखोंचे नुकसान

- Advertisment -

ताज्या बातम्या