Wednesday, September 11, 2024
HomeनाशिकLoksabha Election 2024 : शरद पवारांचे नाशकात आगमन; संध्याकाळी भगरेंच्या प्रचारार्थ वणीत...

Loksabha Election 2024 : शरद पवारांचे नाशकात आगमन; संध्याकाळी भगरेंच्या प्रचारार्थ वणीत सभा

नाशिक | Nashik

देशासह राज्यात पहिल्या चार टप्प्यातील मतदान (Voting) पार पडले असून पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. या चौथ्या टप्प्यात जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी (Nashik and Dindori Lok Sabha) मतदान पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) आणि नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव (Pimpalgaon) येथे सभा पार पडणार आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस नाशिकसाठी ब्लॉकबस्टर ठरणार आहे. या सभेसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे काही वेळापूर्वीच नाशकात आगमन झाले असून त्यांची सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वणी येथे सभा होणार आहे.

शरद पवार हे नाशकातील हॉटेल एमरॉल्ड पार्क येथे नुकतेच पोहचले असून त्यांच्या भेटीसाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहेत. शरद पवार हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांची आज वणी येथे तर उद्या सटाणा आणि मनमाडमध्ये सभा होणार आहे. त्यामुळे आता मोदींची सभा पार पडल्यानंतर शरद पवार या दोन्ही सभांमध्ये नेमके काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या