Monday, November 11, 2024
Homeनाशिकअन् राष्ट्रवादीने मागण्यांचे निवेदन चिटकवले भिंतीवर

अन् राष्ट्रवादीने मागण्यांचे निवेदन चिटकवले भिंतीवर

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

आरटीईच्या (RTE) वेबसाइटसंदर्भात निवेदन (memorandum) देण्यासाठी

- Advertisement -

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे शिष्टमंडळ (delegation of Nationalist Students Congress) शिक्षण उपसंचालक (Deputy Director of Education) यांच्या कार्यालयात गेले होते, मात्र कार्यालयात अधिकारीच नसल्यामुळे पदाधिकार्‍यांनी निवेदन (memorandum) थेट उपसंचालकांच्या भिंतीवर चिटकून निषेध व्यक्त केला.

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष रमिज पठाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ आज मागण्यांचे निवेदन घेऊन शिक्षण उपसंचालकाच्या कार्यालयात गेले होते. शिक्षणाचा अधिकार (Right to Education) (आर.टी.ई) या योजनेत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांना (students) खासगी शाळेत मोफत प्रवेश दिला जातो, या योजनेत ऑनलाइन प्रवेश अर्ज (Online Admission Application) करण्यासाठी तांत्रिक अडचणी येत असून अत्यंत संथगतीने वेबसाईट चालत आहे.

यामुळे पालकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणात वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्वरित लक्ष देऊन पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पठाण यांच्यासह संकेत गायकवाड़, अमोल पाटील, आकाश बिरादर, धनंजय भालेराव उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या