Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्याअजित पवारांच्या बंडावर उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “आधी पक्ष फोडला जायचा, आता...”

अजित पवारांच्या बंडावर उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “आधी पक्ष फोडला जायचा, आता…”

यवतमाळ | Yavatmal

गेल्यावर्षी शिवसेनेत (Shiv Sena) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० पेक्षा अधिक आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवत वेगळा गट तयार केला. या घटनेला एक वर्षे पूर्ण होत नाही तो अशीच बंडखोरी राष्ट्रवादीत (NCP) पाहायला मिळत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी ३० पेक्षा अधिक आमदारांना सोबत घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान यावरूनच उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा भाजपवर निशाणा साधला आहे. आधी पक्षातील लोकं फुटायचे आता पक्ष पळवला जातोय, असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. यवतमाळ येथे माध्यमांशी ते संवाद साधत असून, यावेळी त्यांनी ही टीका केली आहे.

- Advertisement -

अजित पवार यांच्या बंडावरुन उद्धव ठाकरे म्हणाले, पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेला हे पटलेले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या बंडानंतर अनेक जण मला सांगत आहे की, उद्धवजी आम्ही तुमच्यासोबत आहे. पक्ष पळवण्यावर मला एवढे सांगायचे आहे की, तुम्ही पीक नेऊ शकता मात्र शेती आमच्याकडेच आहे. आणि जे पीक तुम्ही पळवून नेले त्याला हमीभाव भेटतो का ते आता पहा, असा टोलाही मंत्रिपदांवरून त्यांनी शिंदे गटाला लगावला. तसेच, कार्यकर्त्यांचे काय म्हणणे आहे, हे समजून घेण्यासाठी मी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

NCP Crisis : राज्यभरात माफी मागत फिरणार का? भुजबळांचा पवारांना खोचक सवाल

तसेच, अमित शहांच्या भेटीबद्दल त्यांनी भाष्य केले. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचे ठरले होते ही मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो,असेही ते म्हणाले. ठरल्याप्रमाणे अडीच अडीच वर्षे सेना-भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. आता भाजपच्या नेत्यांना सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आता मी दौऱ्याच्या ठिकाणी जाहीर सभा घेत नाही. शेतकरी आता शेतीच्या कामात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना भेटत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाच्या आमदारांसंदर्भात निर्णय दिला आहे. त्यानुसारच विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर आम्हाला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उघडे आहेत. शिवसेनेत इनकमिंग सुरु आहे. मेहनत करणाऱ्यांना संधी मिळते, असे ठाकरे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या