Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRohit Pawar: "पळून जाणारे गेले, पण, मी लढणार अन्…"; रोहित पवारांनी ईडी...

Rohit Pawar: “पळून जाणारे गेले, पण, मी लढणार अन्…”; रोहित पवारांनी ईडी कारवाईविरुध्द दंड थोपटले

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा , 2002 अंतर्गत पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले. याविरोधात आता रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले असून शनिवारी (12 जुलै) पत्रकार परिषद घेत आपली बाजू सर्वांसमोर मांडली. “मी कारखाना घेतला तेव्हा शिखर बँकेवर राजकीय नेते नव्हते. ईडीने ज्यांच्यावर गुन्हा दाखल होता त्या ९७ पैकी बहुतांश नेते हे आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत, भाजपसोबत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यातील लोकांवर कोणतीही कारवाई होत नाही. मात्र माझ्याविरोधात आता ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. पळून जाणारे गेले आहेत, पण मी मात्र विचारांसोबत आहे, जनतेसोबत आहे आणि मी लढणार अन् जिंकणार आहे,” असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

आम्ही त्याचीच वाट पाहत होतो
पुढे रोहित पवार असेही म्हणाले, एका ठराविक काळात हे आरोपपत्र दाखल होणे गरजेचे असते. त्यामुळे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले असून आम्ही त्याचीच वाट पाहत होतो. पळून जाणारे गेले आहेत, पण मी मात्र विचारांसोबत आहे, जनतेसोबत आहे. पळून जाणारे गेले आहेत, पण मी मात्र विचारांसोबत आहे, जनतेसोबत आहे. मी लढणार आणि जिंकणार आहे,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

न्यायदेवता मला न्याय देईल
ईडी आरोपपत्राविषयी पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, “आरोपपत्र दाखल करण्यात आल्याने आता आम्हाला न्यायालयीन लढाई लढावी लागले आणि न्यायदेवता मला न्याय देईल, असा विश्वास आहे. सेशन्स कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही ही लढाई लढू आणि विजय आमचाच होईल. कारण आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही,” असा दावा त्यांनी केला आहे.

YouTube video player

माझ्या एकट्यावर ईडीकडून कारवाई करण्याचा प्रयत्न झाला
“2012 साली बारामती ऍग्रोन कन्नड सहकारी कारखाना खरेदी केला होता. त्याप्रकरणी ईडीने माझ्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. 2011 साली राज्य सहकारी बँकेवर प्रशासक बसवण्यात आले. राज्य सहकारी बँकेकडून कन्नड सहकारी करण्यासाठी तीनवेळा टेंडर काढण्यात आले. तिसऱ्यावेळी बारामती ऍग्रोने 50.02 कोटी रुपयांना विकत घेण्यात आला. ईडीने 97 लोकांवर गुन्हा दाखल केला होता. त्यात माझे नाव नव्हते. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी टेंडर काढण्यात आल्यानंतर हा कारखाना खरेदी करण्यात आला. पण, ज्या 97 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता ते राहिले बाजूला आणि मी ज्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी टेंडर काढण्यात आल्यानंतर हा कारखाना खरेदी केला होता, माझ्या एकट्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न ईडीच्या अधिकाऱ्यांकडून झाला. माझे नाव FIR मध्ये नसताना मुद्दाम टाकण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना आदेश पाळावा लागतो.” असा दावा त्यांनी केला आहे.

याआधी दोन वेळा ईडीने माझी चौकशी केली
यापूर्वी दोन वेळा ईडीने माझी बारा तास चौकशी केली. मी त्यांना काही कागदपत्रे दिली, त्यात त्यांना काही सापडले नाही. कारखान्यांवर सांकेतिक ताबा ईडीचा आहे. कारखान्याचे कामकाज अजूनही सुरू आहे, त्यावर माझा ताबा आहे. आता नियोजित कालावधीमध्ये आरोपपत्र करावे लागते, म्हणून पुरवणी आरोपपत्रात माझे नाव घेण्यात आले. याविरोधात मी न्यायालयात जाणार आहे. न्यायालयीन लढाई मी जिंकेन, यावर माझा विश्वास आहे. आक्षेप असलेले ९७ नेते एकनाथ शिंदे , भाजप आणि अजितदादांसोबत गेले आहेत. मी एकटाच सरकारच्या विरोधात बोलतो आहे, विरोध करतो आहे, म्हणून माझे नाव आरोपपत्रात घेण्यात आल्याचे रोहित पवार म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

संपादकीय : ७ जानेवारी २०२६ – जगाच्या ठेकेदाराची दादागिरी

0
अमेरिका स्वतःला जगाचा एकमेव तारणहार-पालनहार समजते आणि या गृहीतकाला सगळ्या जगाने मान तुकवून मान्यता द्यावी असा अट्टहास नेहमी सुरु असतो. त्यासाठीच मनमानी करून वाट्टेल...