मुंबई | Mumbai
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कधी होणार याची मोठी उत्सुकता आहे. राजकीय पक्षांप्रमाणेच मतदारांच्याही मनात निवडणुकीच्या तारखांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबत महत्वाचे विधान केलं आहे. बारामतीमध्ये ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.
शरद पवार म्हणाले , निवडणकू आयोगाची टीम राज्यात आली होती. त्यांनी अनेक पक्षांच्या प्रमुखांसोबत चर्चा केली. त्यानंतर मी काही राजकीय नेत्यांसोबत बोललो. त्यातून असे दिसते की ६ ते १० ऑक्टोबर दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील आणि त्या दिवसांपासून आचारसंहिता लागू होईल. १५ ते २० नोव्हेंबर दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाविकास आघाडी उमेदवारांची घोषणा करेल असेही पवार म्हणाले.
हे हि वाचा : “अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला…”; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केली खळबळजनक ऑडिओ क्लीप
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी पक्ष बदलाची संकेत दिल्यानंतर इंदापूरमधील राजकारण तापल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या भेटीसाठी गोविंद बागेत इंदापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आगामी विधानसभा निवडणुकासाठी इच्छुक उमेदवार आप्पासाहेब जगदाळेंनी प्रवीण माने देखील या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेण्याचा शरद पवार यांनी शब्द केला.
हे हि वाचा : ७/१२ च्या नोंदीवरुनही मिळणार कापूस आणि सोयाबीनचे अनुदान