Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजVikas Lawande: शाईफेक करणारे संग्राम भंडारे मोकाट, पण कसलाही…; राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते...

Vikas Lawande: शाईफेक करणारे संग्राम भंडारे मोकाट, पण कसलाही…; राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते विकास लवांडेंना अटक

पुणे | Pune
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान केले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांना वाघोली पोलीसांकडून अटक करण्यात आली आहे. वकील अशोक बेद्रे यांनी त्यांच्या अटकेची माहिती दिली आहे. ‘माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट आहेत. पण, एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना अटक करण्यात आली आहे,’ असा आरोप विकास लवांडेंनी केला आहे.

विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी वारकरी संप्रदायात घुसखोरी झालेली आहे, असे म्हणत लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी काही वारकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे किर्तनकार संग्राम भंडारे यांनी त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी शाईफेक केली होती. या शाईफेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगालच व्हायरल झाला होता. तर या घटनेनंतर शरद पवार यांच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लवांडे यांचा दुग्धाभिषेक केला होता. दरम्यान, हे प्रकरण मागे पडलेले असतानाच आता लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी जामीनासाठी कोर्टात अर्ज दाखल केला होता. पण पुणे न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला. लवांडे यांच्यावर प्रलंबित असलेल्या एकूण गुन्ह्यांची माहिती न दिल्याने न्यायालयाने त्यांचे अंतरिम अटकपूर्व जामीन संरक्षण काढून घेतले असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली आहे. खोट्या गुन्ह्यात अटक केल्याची प्रतिक्रिया विकास लवांडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. विकास लवांडे यांनी एक्सवर पोस्ट करत कारवाई केल्याची माहिती दिली आहे.

चोर सोडून संन्याशाला फाशी
माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे गुंड संग्राम भंडारे व इतर सर्व आरोपी मोकाट असून वाघोली पोलीस स्टेशनचे पोलिस एका खोट्या फिर्यादीवरून कसलाही पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी मला फोन न करता रात्री घरी आले मी घरी नव्हतो. कुटुंबीयांना माझ्या अटकेबाबत निरोप दिला कुटुंबांना घाबरवण्याचा हा प्रयत्न होता काय ? असा माझा सवाल आहे ? पोलीस मला फोन करू शकले असते. मी फरार नाही किंवा माफीवीर नाही. शासनाने मला जरूर अटक करावी मी पोलिसांना सहकार्य करणारा माणूस आहे कारण मी कायदा पाळणारा माणूस आहे, कायदा हातात घेणारा माणूस नाही. सत्यासाठी लढत राहणार सत्याग्रही पद्धतीने जामीन , वकील ,दंड देणार नाही. पुणे पोलिसांनी मला जरूर अटक करावी मी तयार आहे. आता मला पुण्यातून पोलीस #वाघोली पोलीस स्टेशनला घेऊन चाललेले आहेत, अशी माहिती देखील विकास लवांडे यांनी दिली आहे.

दरम्यान, ९ मे रोजी लोणी काळभोर येथे विकास लवांडे यांच्यावर शाईफेक झाली होती. या घटनेनंतर कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह एकूण १४ जणांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता लवांडेंच्या अटकेमुळे वाद वाढण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

IND vs PAK-W : आज भारत-पाकिस्तान महामुकाबला; कशी असेल Playing 11?

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ (ICC Women's T20 World Cup 2026) मध्ये रविवारी (दि.१४) क्रिकेट जगतातील सर्वात मोठी...