Friday, May 31, 2024
Homeमुख्य बातम्याबाबरीप्रकरणी शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले...

बाबरीप्रकरणी शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी (८ ऑगस्ट) एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी बाबरी मशिद विध्वंसासंदर्बात मोठा गौप्यस्फोट केला आहे. रामजन्मभूमी आंदोलनाला वेग आला असताना, बाबरी मशिदीला काहीही होणार नाही, या भाजपच्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका, असा सल्ला त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना दिला होता, असा खुलासा शरद पवार यांनी केला.

- Advertisement -

शरद पवार म्हणाले की, तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि गृह सचिव माधव गोडबोले यांच्यासोबत मी त्या बैठकीला उपस्थित होतो. त्यावेळी विजया राजे सिंधिया यांनी बाबरी मशिदीला काहीच होणार नाही, असं आश्वासन नरसिंह राव यांना दिलं होतं. तसेच भाजपवर विश्वास ठेवू नका. बाबरी मिशिदीला काहीच होणार नाही. आम्ही नरसिंह राव यांना सल्ला दिला. पण आमच्याऐवजी नरसिंह राव यांनी भाजपवर विश्वास ठेवला. विजया राजे यांचा हा सल्ला नरसिंह राव यांनी स्वीकारला. त्यानंतर मी, गृहमंत्री आणि गृहसचिवांनी नरसिंह राव यांना भाजपवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला होता. कारण काहीही होऊ शकतं असं आम्ही सांगितलं होतं. पण पंतप्रधानांनी भाजपवर विश्वास ठेवला. त्यानंतर काय झालं हे तुमच्यासमोर आहे. असे शरद पवार म्हणाले.

दरम्यान, अयोध्येतील वादग्रस्त वास्तूचा मुद्दा अतिशय संवेदनशील झाला होता. यावेळी काही वरिष्ठ पत्रकारांसोबत पंतप्रधान नरसिंह राव यांची बातचीत झाली. यावेळी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना बाबरीबाबत विचारले असता त्यांनी आपण ते घडू दिल्याचे नरसिंह राव यांनी मान्य केल्याचा दावा निरजा चौधरी यांनी केला. यामुळे भाजपाचा एक मुद्दा कायमचा संपुष्टात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितल्याचे निरजा चौधरी यांनी स्पष्ट केले. भाजपा आपले हिंदुत्वाचे कार्ड हरवून बसेल, असेही पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना वाटल्याची माहिती निरजा चौधरी यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या