Friday, November 22, 2024
Homeनगरराष्ट्रवादीच्या इच्छुकांनी मांडले पवारांसमोर विजयाचे गणित

राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी मांडले पवारांसमोर विजयाचे गणित

पुण्यात 21 जणांच्या मुलाखती पूर्ण || दसर्‍यानंतर उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या बैठकीत सोमवारी (दि. 7) जिल्ह्यातील 10 मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी विधानसभेसाठी मुलाखती देत आपापल्या विजयाचे गणित मांडले. आता पक्षाचे अध्यक्ष पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे पार्लमेंटरी बोर्ड जिल्ह्यातील विधानसभेचे उमेदवार जाहीर करणार आहेत. मात्र, यासाठी दसर्‍यानंतरचा मुहूर्त असणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

पुण्यात सोमवारी दुपारी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यांतील राष्ट्रवादीच्या पवार गटातील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. यावेळी खा. शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, खा. नीलेश लंके, खा. भास्कर भगरे, सुनील भोसारी यांच्यासह नगर जिल्ह्यातून दादा कळमकर, राजेंद्र फाळके, संदीप वर्पे, प्रताप ढाकणे यांच्यासह 10 मतदारसंघांतील इच्छुक उमेदवार हजर होते. यावेळी पुणे जिल्ह्यातील नियोजित कार्यक्रमामुळे शरद पवार यांना येण्यास उशीर झाल्याने नगर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती सायंकाळी सुरू झाल्या. त्यानंतर बैठकीच्या ठिकाणी असणार्‍या बंद खोली उमेदवारीसाठी अर्ज केलेल्या इच्छुक आणि पार्लमेंटरी बोर्डातील हजर असणोर प्रमुख यांची एकत्रित बैठक झाली.

यावेळी मतदारसंघनिहाय प्रत्येकाला उमेदवारी आणि विजयाचे गणित यावर मतमांडण्याची संधी देण्यात आली. यावेळी इच्छुकांनी आपआपल्या मतदारसंघात राष्ट्रवादीची स्थिती, विजयाचे गणित पवार यांच्यासमोर मांडले. पवार यांनी इच्छुक उमेदवारांचे म्हणणे ऐकून घेत मुलाखती संपवल्या. नगरनंतर नाशिक जिल्ह्यातील मुलाखती झाल्या. मुलाखतीनंतर अनेक इच्छुकांशी संपर्क साधाल्यानंतर पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी नोंदवण्यात आली असून अंतिम निर्णय पवार आणि पार्लमेंटरी बोर्ड घेणार असल्याचे सांगण्यात आले. दसर्‍यानंतर राष्ट्रवादीची विभागनिहाय पहिली, दुसरी अशा याद्या जाहीर होणार आहेत. त्यात पहिल्या यादीत कोणकोण उमेदवारी पटकवणार याकडे राज्याचे लक्ष राहणार आहे.

आचारसंहितेनंतर नगर जिल्ह्यात खिंडार
भाजपसह शिवसेना शिंदे गटात असणार्‍या जिल्ह्यातील बडे नेते राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संपर्कात आहे. आताच गडबड करत मोठ्या पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास अडचण होईल, या भितीपोटी अनेकजण राष्ट्रवादीच्या दारावर उभे आहेत. दसर्‍यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच जिल्ह्यातील अनेक शुगर लॉबीतील नेते पवार यांच्या राष्ट्रवादीत उड्या मारणार आहेत. तसेच झाल्यास नगर जिल्ह्यात भाजपसह सत्ताधारी महायुतीला खिंडार पडणार आहे.

यांनी मांडले म्हणणे…
यावेळी इच्छुकांपैकी राहुरीचे आ. प्राजक्त तनपुरे नियोजित कार्यक्रमामुळे हजर नव्हते. साधारणपणे अर्धा ते एक तासात बैठकीतील मुलाखती संपल्या. यावेळी अकोले अमित भांगरे, मधुकर तळपाडे. कोपरगाव दिलीप लासुरे, संदीप वर्पे. शिर्डी रणजित बोठे, अ‍ॅड. नारायण कार्ले. नेवासा डॉ. वैभव शेटे. शेवगाव-पाथर्डी प्रताप ढाकणे, विद्या गाडेकर. पारनेर राणी लंके, रोहिदास कर्डिले, माधवराव लामखडे. नगर शहर डॉ. अनिल आठरे, अभिषेक कळमकर, शौकत तांबोळी. श्रीगोंदा बाबासाहेब भोस, राहुल जगताप, निवास नाईक, आण्णासाहेब शेलार. कर्जत आ. रोहित पवार यांनी मुलाखती देत आपापल्या मतदारसंघाचे चित्र पवार यांच्यासमोर मांडले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या