Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar : "पोलीस अत्याचारमध्ये…"; सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेत शरद...

Sharad Pawar : “पोलीस अत्याचारमध्ये…”; सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेत शरद पवारांनी दिला धीर

परभणी | Parbhani

परभणीत मंगळवार (दि.१० डिसेंबर) रोजी संविधान शिल्पाची मोडतोड झाल्याची घटना घडल्यानंतर मोठा हिंसाचार उसळला होता. या घटनेनंतर परभणीत मोठा हिंसाचार झाल्याचे दिसून आले.या घटनेत काहींना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये पोलिसांच्या कोठडीत असताना सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले. या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी परभणीत सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

- Advertisement -

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, “घरातील कर्त्या मुलाचं निधन होणं धक्कादायक आहे. देवाघरी गेलेला मुलगा आता परत येऊ शकत नाही. मुलगा गमावण्याचं दु:ख मोठं आहे. ते दु:ख सोसणं सोपं नाही. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्ही तुमच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवू. तुम्हाला न्याय मिळवून देऊ,” असे आश्वासन यावेळी पवारांनी सूर्यवंशी कुटुंबाला दिले.

तसेच परभणीत (Parbhani) झालेल्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून लोक रस्त्यावर आले होते. शांततेत आंदोलन करणाऱ्यांना कॉम्बिंग ऑपरेशन करुन ताब्यात घेणं चूक आहे. झालेला प्रकार अतिशय धक्कादायक आहे. पोलिसी अत्याचारामुळे मुलगा आपल्यातून गेला ही बाब अतिशय दु:खद आहे,’ अशा शब्दांत पवारांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे (Family) सांत्वन केले.

सोमनाथच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुणा

मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या लहान भावाने शरद पवारांसमोर आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, माझ्या भावाच्या मृतदेहाची (Dead Body) उत्तरीय तपासणीनंतर आम्हाला त्याचे पार्थिव देण्यात आले. त्यावेळी त्यांच्या मृतदेहावर एकही कापड नव्हते. त्यांना कोणाताही आजार नव्हता. पोलिस कोठडीत त्यांना मारहाण झाली. वेगळ्या कोठडीत नेऊन त्यांना मारहाण झाली. त्यांच्या मृतदेहावर मारहाण केल्याच्या अनेक जखमा होत्या. जे माझ्या भावासोबत घडले ते दुसऱ्या कोणाबद्दल घडू नये, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

राहुल गांधी २३ तारखेला परभणी दौऱ्यावर

आज शरद पवार यांनी परभणीत जात सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे देखील सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी २३ तारखेला परभणीत जाणार आहेत.२३ तारखेला सकाळी ११ वाजता राहुल गांधी दिल्लीहून विशेष विमानाने नांदेड पोहोचतील. त्यानंतर १.१५ वाजता ते गाडीने नांदेडहून परभणीला जातील. २.४५ च्या सुमारास राहुल गांधी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची शोक भेट घेतील. यानंतर ते दिल्लीसाठी रवाना होतील. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...