Wednesday, July 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजJitendra Awhad: "…तर हि जुलमी राजवट महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये…" महिला डॉक्टर आत्महत्येवरुन जितेंद्र...

Jitendra Awhad: “…तर हि जुलमी राजवट महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये…” महिला डॉक्टर आत्महत्येवरुन जितेंद्र आव्हाड आक्रमक

मुंबई | Mumbai
फलटणच्या जिल्हा उपरुग्णालयात काम करणाऱ्या एका डॉक्टर तरुणीने तीन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी या डॉक्टर तरुणीने एक चिठ्ठी आणि तळहातावर लिहिलेल्या मजकूरात फलटणमधील पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर नामक व्यक्तीवर बलात्कार व छळ केल्याचे, तसेच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे आरोप केले होते. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे.

नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी X वर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी आरोप केला आहे की, “ही आत्महत्या नसून ही संस्थात्मक हत्या आहे. डॉक्टर तरुणीवर चुकीचे व नियमबाह्य अहवाल देण्यासाठी, तसेच काही पोस्टमार्टेम रिपोर्ट (शवविच्छेदन अहवाल) बदलण्यासाठी दबाव टाकला जात होता. ती या सगळ्यांशी एकटी लढत होती. मात्र, सगळ्या त्रासाला कंटाळून तिने जीवन संपवलं.”

- Advertisement -

“फलटणमधील डॉक्टर तरुणीची आत्महत्या नसून ही संस्थात्मक हत्या आहे. एका शेतकरी आई-बापाने मोल मजुरी करून, ऊसतोडणी करून आपल्या लेकीला जिद्दीने घडवले, ती कर्तबगार लेक म्हणजे ही डॉक्टर तरुणी! चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसेच काही पी. एम. रिपोर्ट बदलण्यासाठी तिच्यावर स्थानिक पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून प्रचंड दबाव टाकत होते. पण, डॉक्टर तरुणी कोणत्याही दबावाला न घाबरता आपली आरोग्यसेवा प्रामाणिकपणे करत होती.”

“ती अनेक महिन्यांपासून या प्रशासनातल्या असूरी शक्तींविरुद्ध नियतीचा लढा एकटी लढत होती. पोलीस व प्रशासन आरोग्य विभागातील वरिष्ठ – कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने एकत्र येऊन केलेली संस्थात्मक हत्या आहे. आज आवाज नाही उठवला तर हि जुलमी राजवट महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये एक डॉ.संपदा करतील..

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या